मुघल आक्रमकांनी हजारो वर्षांपासूनची हिंदूंच्या (Hindu) देवी देवतांची मंदिरे पाडून त्यावर मशिदी उभारली आहेत. यातील बरीच मंदिरांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यातील अयोध्या आणि ज्ञानवापी संबंधी न्यायालयांनी हिंदूंच्या बाजूने निर्णय दिल्यावर अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहिले. ज्ञानवापी येथे श्रीकृष्णाचे मंदिर असल्याचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे, तेथे हिंदूंना (Hindu) पूजा करण्याचा अधिकार न्यायालयाने दिला आहे. आता हिंदूंचे आणखी एक श्रद्धास्थान मुसलमानांच्या आक्रमणापासून मुक्त होणार आहे.
मागील ५० वर्षांपासून उत्तर प्रदेशात बागपत येथील लक्षागृहाचा विषय प्रलंबित आहे. त्यावर बदरुद्दीन शाह मजार असल्याचा दावा मुसलमानांनी केला आहे. त्यामुळे महाभारतातील जीवंत वारसा असलेल्या लक्षागृहाची जमीन हिंदूंना (Hindu) मिळत नाही. त्यामुळे आता अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशाने येथील वादग्रस्त ५ एकर जमीन हिंदूंना देण्याचा निर्णय दिला आहे. मुकीम खान नावाच्या मुसलमानाने येथील लक्षागृहाच्या ठिकाणी उभारण्यात आलेली मजार बदरुद्दीन शाह यांची असून तिथे मुसलमानांचे कब्रस्तान अनेक वर्षांपासून असल्याचे म्हटले होते. मात्र हे हिंदूंचे (Hindu) लक्षागृह असल्याचा हिंदूंचा दावा आहे. त्यांनी न्यायालयात तसा दावा केला आहे. १९७० नंतर अनेकवेळा या प्रकरणी हिंदू-मुस्लिम आमनेसामने आले होते. या प्रकरणी हिंदूंनी पुरावेही सादर केले. त्यावर न्यायालयाने आता हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला आहे.
(हेही वाचा Nexalist : मुंबईसह ५ शहरे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर; काय आहे पोलिसांचा अहवाल?)
काय आहे लक्षागृह?
महाभारत काळापासून या ठिकाणी लक्षागृह (लाखापंडप) अस्तित्वात आहे. या जागेचा पांडवांशी संबंध आहे. येथील एका संस्कृत शाळेतील प्राचार्य आचार्य अरविंद कुमार शास्त्री यांनी याबाबत सांगितले की, ही छोटी टेकडी महाभारत काळातील लाक्षागृह आहे. येथे पांडवकालीन बोगदादेखील आहे. याच बोगद्याचा वापर करून पांडव लाक्षागृहातून पळून गेले होते. या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे इतिहासकार सांगतात. भारतीय पुरातत्व विभागाने १९५२ मध्ये येथे उत्खनन केले होते. या उत्खननावेळी तिथे दुर्मिळ अवशेष सापडले होते. ४,५०० वर्षे जूनी भांडीदेखील सापडली होती. ही भांडी महाभारतकालीन असल्याचा दावा केला जातो.
Join Our WhatsApp Community