बेस्टनंतर आता मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरही एकच सामायिक कार्ड ( National Mobility Card) सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना या एकाच कार्डवर प्रवास करता येणार आहे. या योजनेमुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे. पुढच्या वर्षी याची अंमलबजावणी होणार असून, सप्टेंबरमध्ये निविदा काढण्यात येणार आहेत.
मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय प्रवाशांसाठीही बेस्टप्रमाणे एकच सामायिक कार्ड यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी एमआरव्हीसी प्रयत्नशील आहे. उपनगरीय रेल्वेचा आवाका मोठा आहे. दररोज प्रवास करणा-या प्रवाशांची संख्याही सुमारे 65 लाखांहून अधिक आहे. त्यामुळे सामायिक कार्डची अंमलबजावणीसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
( हेही वाचा: भाजपाचा तिरंगा आणि कॉंग्रेसचा तिरंगा वेगळा आहे का? )
‘या’ सेवा कायम राहणार
प्रवेशद्वारांवर कार्ड रीडर बसवल्यास रांगा लागण्याची शक्यता, तिकीट तपासनीसांचे मनुष्यबळ आणि उपलब्धता, त्यांना लागणारी उपकरणे यासह अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिका-यानेही सांगितले. ही सेवा उपलब्ध करुन देतानाच रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर मिळणारी सेवा, एटीव्हीएम, जनसाधारण तिकीट आरक्षण सेवा मात्र कायम राहणार आहेत.
Join Our WhatsApp Community