ब्रिटननंतर अमेरिकेचाही Sheikh Hasina यांना आश्रय देण्यास नकार

163

बांगलादेशातील अराजकतेमुळे पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांना देश सोडून भारतात आश्रयाला यावे लागले. त्यांचा भारतातून लंडन किंवा अमेरिकेला जाण्याचा विचार होता. पण शेख हसीना यांना ब्रिटनने तूर्तास भारतातच रहा, असे सांगितले, आता अमेरिकेनेही शेख हसीना यांना झटका दिला आहे. शेख हसीना भारतातून लंडनला जाणार असल्याची चर्चा होती. ब्रिटन सरकार कठोर भूमिका दाखवत आहे. शेख हसीना यांना ब्रिटनमधून हिरवा सिग्नल मिळताना दिसत नाही. बांगलादेशातील विरोधकांच्या जवळच्या सूत्रांनी दावा केला आहे की, अमेरिकेने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचा व्हिसाही रद्द केला आहे.

(हेही वाचा Shri Tulja Bhavani Temple मधील भ्रष्टाचाराला पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश)

ब्रिटनकडून अजून परवानगी नाही

ब्रिटिश इमिग्रेशन नियम कोणालाही आश्रय घेण्यासाठी प्रवास करण्यास परवानगी देत नाहीत. ब्रिटनच्या या भूमिकेमुळे शेख हसीना यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या त्या भारतात आहेत. गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्टच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे काही काळ आता त्यांना इथेच राहावे लागणार आहे. ज्या लोकांना आंतरराष्ट्रीय संरक्षणाची आवश्यकता आहे, त्यांनी प्रथम सुरक्षित देशात आश्रय घेतला पाहिजे, असे यूकेने म्हटले. ब्रिटिश सरकार हसीना यांच्या औपचारिक आश्रयाच्या विनंतीवर कारवाई करत आहे. शेख हसीना यांची बहिण रेहाना यांच्याकडे यूकेचे नागरिकत्व आहे. त्यामुळे त्या लवकरच यूकेला जाऊ शकतात. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेश आणि अमेरिकेतील संबंध चांगले नव्हते. त्यामुळे त्यांना आता अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेख हसीना यांनी अमेरिकेला लष्करी तळ बांधण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. अमेरिकेनेही शेख हसीनासाठी आपले दरवाजे बंद केले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.