कोविडनंतर आता कृत्रिम तलावांकडे गणेश भक्तांचा कमी होतोय कल…

135

गणेशोत्सवामध्ये समुद्र चौपाटींसह तलावांमध्ये जलप्रदुषण होऊ नये म्हणून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे विसर्जन व्हावे म्हणून महापालिकेच्यावतीने कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्यावतीने करण्यात आली. यंदा मुंबईत १५२ कृत्रिम तलावे निर्माण करण्यात आल्यानंतरही भाविकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांऐवजी समुद्रांसह तलावांमध्ये नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करण्यावर भर दिला असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कोविडमध्ये ज्या कृत्रिम तलावांकडे भक्तांचा ओघ होता, त्या कृत्रिम तलावांकडे भक्तांनी पाठ फिरवल्याचे पहायला मिळत आहे.

१५२ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली

मुंबईत गणेश विसर्जनासाठी ७३ विसर्जनस्थळे असून मुंबईत पालिकेने मागील वर्षी १७३ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा  फिरत्या कृत्रिम तलावांची संख्या कमी करण्यात आली. मात्र, १५२ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. या सर्व तलावांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत एकूण विसर्जित झालेल्या १ लाख ९३ हजार ०६२ गणेश मूर्तींपैकी  केवळ ६६ हजार १२७ मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्ये पार पडले. यामध्ये  ६१,९८५ घरगुती आणि १८२२ सार्वजनिक मूर्तींचा समावेश होता.

(हेही वाचा मुंबईत कोविडनंतरही दोन हजार मंडळांचे उत्सव झाले बंद

कोविडपूर्वी केवळ ३४ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली

सन २०२१ मध्ये विसर्जित झालेल्या एकूण १ लाख ६४ हजार ७६१  गणेश मूर्तींपैकी ७९ हजार १२९ गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये झाले, तर त्या आधीच्या म्हणजे सन २०२०मध्ये एकूण १ लाख ३५ हजार ५१५ मूर्तींपैकी  ६८,११९ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये झाले. तर कोविड पूर्वी म्हणजे सन २०१९मध्ये एकूण १ लाख ९६ हजार ४८३ पैकी ३३,२१७ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये झाले. कोविडपूर्वी केवळ ३४ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु कोविडमध्ये ही संख्या मोठ्या संख्येने वाढली. परंतु कोविडमध्ये ज्याप्रकारे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यावर भाविकांचा कल होता, त्या भाविकांचा कल आता कोविडनंतर दिसून आला नाही.

कृत्रिम तलावांमधील एकूण गणेश मूर्तींचे विसर्जन

  • सन २०२२ :  एकूण विसर्जन : ६६,१२७ ( घरगुती :६१९८५,  सार्वजनिक :१८२२)
  • सन २०२१ :  एकूण विसर्जन : ७९,१२९ ( घरगुती :७२३४७,  सार्वजनिक :३४९८)
  • सन २०२० :  एकूण विसर्जन : ६८,११९ ( घरगुती : ६४३८६,  सार्वजनिक :३७३३)
  • सन २०१९ :  एकूण विसर्जन : ३३,२१७ ( घरगुती : ३२६२९,  सार्वजनिक :५८८)

(हेही वाचा भारत जोडो यात्रेत राहुल गांधी वादग्रस्त ख्रिस्ती धर्मगुरूला विचारतात, ‘येशू ख्रिस्त देवाचे रूप आहे का?’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.