यंदाची ७१वी Miss World 2023 स्पर्धा आयोजित करण्याचा मान भारताला मिळाला आहे. आणि भारत ही स्पर्धा चक्क कश्मीरच्या खोर्यात आयोजित करणार आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मिस वर्ल्डचे सीईओ एरिक मोरली यांनी याबद्दलची माहिती दिली. जागतिक स्तरावरील ही स्पर्धा यंदा डिसेंबर महिन्यात रंगणार आहे. सुमारे १३० देशांतील सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ८ डिसेंबर २०२३ दिवशी ही स्पर्धा होणार आहे.
१९५१ पासून दरवर्षी Miss World 2023 ही स्पर्धा आयोजित केली जाते. सौंदर्य, प्रतिभा आणि बुद्धिमत्ता सादर करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने अशी माहिती दिली आहे. मिस वर्ल्ड २०२३ ही ७१ वी स्पर्धा आहे. भारताने यापूर्वी १९९६ मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले होते, ही स्पर्धा बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतात २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा यजमानपद आले आहे. जवळपास महिनाभर ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत भारतासह १३० देशांतील सुंदरी सहभाग घेणार आहेत.
(हेही वाचा I.N.D.I. A. आणि N.D.A. एकाच दिवशी मुंबईत भिडणार)
Miss World 2023 स्पर्धा नोव्हेंबरमध्ये होणार असून त्यांच्या तारखा ठरलेल्या नाहीत. तसेच जागाही ठरलेली नाही, असे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी सांगितले. ऐश्वर्या राय-बच्चन, प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी, मानुषी चिल्लर या भारताच्या लेकींनी आतापर्यंत या सन्मानावर आपले नाव कोरले आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२३ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणरा असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. स्त्रियांचे सौंदर्य व बुद्धीचा गौरव करणे हा Miss World या खिताबचा मुख्य उद्देश असतो.
Join Our WhatsApp Community