कलम ३७० हटवल्यावर काश्मिरात किती जणांनी खरेदी केल्या जमिनी?

155

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशात आतापर्यंत काश्मीरबाहेरील एकूण ३४ जणांनी या केंद्रशासित प्रदेशात जमीन खरेदी केली आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाकडून लोकसभेत देण्यात आली. काश्मीरचे विभाजन केल्यानंतर काश्मीर बाहेरील किती जणांनी जमीन खरेदी केली? असा प्रश्न विचारला, त्यावेळी केंद्रीय गृहमंत्रालयाने याचे लोकसभेत उत्तर दिले.

कलम ३७० हटवल्यामुळे परिणाम 

कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर तिथे खरेदी करण्यात आलेली बिगर काश्मिरी नागरिकांनी जम्मू-काश्मीरमध्ये जम्मू, रियासी, उधमपूर आणि केंद्र शासित प्रदेशातील गांदरबल जिल्ह्यात खरेदी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ए लागू असताना या प्रदेशात इतर राज्यातील रहिवासी व्यक्तीला जमीन खरेदी करण्याची परवानगीही नव्हती. पण जेव्हापासून जम्मू-काश्मीरला केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आणि कलम ३७० हटवण्यात आले, तेव्हापासून या प्रदेशात कोणताही व्यक्ती जमीन खरेदी करू शकणार आहे.

(हेही वाचा पुन्हा तिसऱ्या आघाडीसाठी हालचाली, आता कशासाठी?)

सौदीच्या तीन कंपन्यांची गुंतवणूक 

केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ मध्ये महत्वाचा निर्णय घेत जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगवेगळे केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आले. सौदीच्या तीन कंपन्यांची मोठी गुंतवणूक काश्मीरमध्ये करणार आहे, असे उद्योग व वाणिज्य विभाग आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे मुख्य सचिव रंजन प्रकाश ठाकूर यांनी दिली. यात एमआर ग्रूप जम्मूच्या प्रदर्शनी मैदान आणि श्रीनगर येथील बादामीबाग येथे दोन मल्टीपर्पज आयटी टॉवर उभारणार आहे. यात सर्व प्रकारच्या कंपन्या असणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.