एसटीला पत्र दिल्यानंतर पीएमपी प्रशासन येत्या दोन दिवसांत ग्रामीण भागातील ११ मार्गांवरची बससेवा बंद करणार आहे. दोन दिवसानंतर एसटी प्रशासन त्या मार्गांवर एसटी सुरू करीत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. पीएमपी प्रशासनाने आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासोबतच तोटा कमी करण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे कमी प्रतिसाद असलेल्या ग्रामीण भागातील ४० मार्गांवरच्या सुमारे १२०० फेऱ्या बंद करण्याचा निर्णय ‘पीएमपी’ने घेतला.
(हेही वाचा – पुण्यातील ‘या’ भागात जाणाऱ्या PMPML बसेस होणार बंद!)
मागच्या आठवड्यातच त्या विषयीचे पत्र एसटी प्रशासनाला दिले, ते पत्र प्राप्त होताच एसटी प्रशासनाने ४० पैकी ११ मार्गांवर सेवा सुरू करण्याचे मान्य केले. मात्र, उर्वरित २९ मार्गांवर सेवा सुरू करणार नसल्याचे ‘पीएमपी’ला कळविले आहे. कोरोना महामारीदरम्यान पीएमपीच्या शहरातील वाहतुकीवर मर्यादा आल्या होत्या. घटणारे प्रवासी उत्पन्न लक्षात घेता पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागात सेवा सुरू केली. मात्र, तो प्रयत्नदेखील अयशस्वी ठरला. शिवाय, ग्रामीण भागात एसटीने सेवा देणे व्यवहार्य असल्याकारणाने पीएमपीने आता ग्रामीण भागात एसटीने सेवा सुरू करावी म्हणून एसटीला पत्र दिले.
हे आहेत पीएमपीचे बंद होणारे ११ मार्ग
- सासवड – यवत
- स्वारगेट – कशिंगगाव
- सासवड – उरुळी कांचन
- स्वारगेट – बेलावडे
- स्वारगेट – खारावडे
- स्वारगेट – मोरगाव
- चाकण – शिक्रापूर
- वाघोली – राहू
- कापूरहोळ – सासवड
- स्वारगेट – विंझर वेल्हा
- स्वारगेट – जेजुरी
ज्या ११ मार्गांवर एसटीची सेवा सुरू होत आहे. त्या मार्गावर दोन दिवसांत पीएमपी बससेवा बंद करीत आहे. उर्वरित २९ मार्गांवर एसटीची सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community