मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना २७ शालेय वस्तू मोफत देण्यात येत असले तरी आद्यपही या वस्तूंचा पत्ता नाही. मात्र आता त्यातील वह्या, शालेय स्टेशनरी आणि रेनकोट यांच्या खरेदीच्या प्रस्तावाला शुक्रवारी प्रशासकांनी मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. या प्रस्तावांना जरी मान्यता मिळाली असली तरी याबाबतचा कार्यादेश देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दीड महिन्यात हे साहित्य मिळणार असल्याने शालेय वह्या, पुस्तके नेण्यासाठी दप्तराचा तर पत्ता नाहीच, उलट निम्मा पावसाळा गेल्यानंतर रेनकोट दिले जाणार आहेत. दप्तराविना शाळेत येणाऱ्या मुलांना पावसाचे पहिले महिने भिजतच शाळेत यावे लागेल, असे दिसते.
(हेही वाचा मत बाद झाले, तर याद राखा! शिवसेनेने आमदारांना दिला दम)
जून महिना उजाडला तरी निविदा अंतिम होत नव्हता
मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेष व इतर शैक्षणिक साधनांचा पुरवठा करण्यात येत असून त्यानुसार विद्यार्थ्यांना वह्या, बूट व मोजे, दप्तर संच आणि स्टेशनरी, रेनकोट यांचे वाटप करण्यात येते. परंतु फेब्रुवारी महिन्यांमध्ये निविदा काढल्यानंतर जून महिना उजाडला तरी या वस्तूंच्या निविदा अंतिम झाल्या नव्हता. यावरून भाजपकडून तीव्र टिका केली जात आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दत्पराचा मुद्दा उपस्थित केल्यानतर भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी शालेय वस्तूंचे प्रस्ताव अद्यापही मंजूर न झाल्याने शिवसेना व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टिका केली होती. मात्र, महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याच्यावतीने वह्या, शालेय स्टेशनरी, रेनकोट आदींचे प्रस्ताव मागील तीन दिवसांपूर्वी प्रशासकांना सादर करण्यात आले होते, हे प्रस्ताव गुरुवारी प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मंजूर केले आहे. त्यामुळे आता कार्यादेश दिल्यानंतर संबंधित संस्थांकडून दीड महिन्यात वस्तूंचा पुरवठा होईल, असे बोलले जात आहे.
- रेनकोट खरेदी : सुमारे ०७ कोटी रुपये
- शालेय वह्या आणि इतर बाबींची खरेदी : सुमारे २४ कोटी रुपयेर
- शालेय वस्तूंची स्टेशनरी खरेदी : सुमारे १८ कोटी रुपये