नर्मदा नदीतील अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एसटी महामंडळाची नवी नियमावली

एसटी महामंडळाची बस १८ जुलै रोजी इंदूर ते अमळनेर या मार्गावर धावत असतांना मध्यप्रदेशातील खलघाट येथे ही नर्मदा नदीच्या पात्रात पडून बुडाली. या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताची महामंडळाने गांभीर्याने दखल घेत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास वाहक आणि चालक यांनी कोणती दक्षता घ्यावी, याविषयी नवीन नियमावली तयार केली आहे. महामंडळाने याविषयी एक परिपत्रकच राज्यातील सर्व आगारांना पाठवले आहे.

काय आहे नवी नियमावली? 

  • पावसाळ्यात चालकांनी वाहन चालविताना अत्यंत दक्षतापूर्वक सुरक्षिततेची खात्री करुन वाहन नियंत्रणात राहील अशा पध्दतीने चालवावे.
  • पावसाळ्यात रस्त्याच्या कडेचा भराव वा कडा भुसभुशीत होण्याची शक्यता असल्याने आपले वाहन एकदम रस्त्याच्या कडेच्या बाजूने चालविणे धोक्याचे असते, म्हणून सुरक्षिततेची खात्री करुन योग्य त्या ठिकाणी आपले वाहन सावकाशपणे बाजूला घेऊन समोरुन येणाऱ्या वाहनाला मार्ग करुन द्यावा.
  • पावसाळ्यात आपल्या पुढे असलेल्या वाहनास अतिवेगात ओलांडून जाण्याचे टाळावे.

(हेही वाचा OBC RESERVATION : ‘या’ जिल्ह्यांना मिळणार नाही आरक्षण!)

  • वादळी हवा, अतिवृष्टी, दाट धुक्यामुळे चालकाला रस्ता स्पष्ट दिसत नसेल तर रस्त्याच्या डाव्या बाजुस, सुरक्षिततेची व रस्त्याच्या कडेचा भराव अथवा कडा भुसभुशीत नाही याची खात्री करून वाहन उभे करावे, रस्ता स्पष्ट दिसू लागल्यानंतर वाहन काळजीपूर्वक पुढे मार्गस्थ करावे.
  • मार्गावरील पुलाचे फरशीवरुन पाणी वाहत असेल तर आपले वाहन कोणत्याही परिस्थित पुढे नेऊ नये, असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांची गंभीर दखल घेण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • घाटरस्ता व नदीवरील पुलावर कोणत्याही परिस्थितीत घाई न करता वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालवू नये, तसेच धोकादायक पध्दतीने समोरील वाहनास ओलांडून (ओव्हरटेक) जाऊ नये. सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दिलेल्या वेगमर्यादा पाळणेबाबत चालकांना सुचना देण्यात याव्यात.
  • एसटी बस मार्गावर जाण्यापूर्वी ती रस्त्यावर जाण्यास सर्वतोपरीने योग्य आहे किंवा नाही याची तपासणी सर्व स्तरावर आगारांमध्ये करण्यात यावी.
  • चालकांच्या बैठका घेऊन अपघात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रबोधन करण्यात यावे. याबाबत स्वतंत्र नोंदवही ठेवुन चालक/वाहकांना सुचना दिल्याबाबत नोंदी घेण्यात याव्यात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here