पन्हाळ्यानंतर आता विशाळगडाचा बुरुज ढासळला, सरकारसमोर मोठे आव्हान 

154

राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी फडणवीस सरकारने विशेष प्रकल्प हाती घेतला होता. त्यानुसार रायगड, सिंहगड यांसारख्या महत्वाच्या गडांच्या संवर्धनाचे काम सुरु झाले, मात्र त्यानंतर ठाकरे सरकार आले. या सरकारने मात्र यासंबंधी विशेष प्रयत्न केले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून आता राज्यातील गड-किल्ले ढासळत चालले आहेत. शिवकालीन इतिहासाचे जीवंत साक्षीदार असलेल्या या वास्तू नामशेष होत आहेत. यंदाच्या पावसात आधी पन्हाळगडाचे बुरुज ढासळले होते, त्यानंतर आता विशाळगडाचा बुरुज ढासळला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या समोर या गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

vishalgad1

राज्यातील गड-किल्ले हे शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार आहेत. ४०० वर्षांपासून हे गड-किल्ले उभे आहेत, मात्र आता हे ढासळू लागले आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता बनली आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याकरता सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. मात्र हे काम कंत्राटीपध्दतीने करू नये, याकरता सरकारने दुर्गप्रेमींची मदत घ्यावी, त्यांना गड-किल्ल्यांच्या बांधणीबाबत ज्ञान आहे.
– सुनील पवार, अध्यक्ष, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती.

(हेही वाचा मनसेसाठी सकारात्मक वातावरण – बाळा नांदगावकरांचा विश्वास )

प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे 

सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सहन करत शिवकालीन इतिहास जिवंत ठेवणारे गड-किल्ले हे पाय रोवून उभे आहेत. मात्र आता ३५०-४०० वर्षांपासून उभ्या असलेल्या गड-किल्ल्यांची अवस्था नाजूक बनत चालली आहे. आता हे गड-किल्ले हळूहळू ढासळत चालले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान विशाळगडावर जाण्यासाठी लोखंडी जिना आहे. त्याच्या बाजूलाच असणारा दगडी बुरुज ढासळला असून हा लोखंडी जिना ये-जा करणेसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी नागरिकांना पर्यायी रोडने गडावर येत- जात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान पन्हाळा गडानंतर आता विशाळगड सुद्धा ढासळत चालला असल्याने प्रशासनाचे गडकिल्ल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल सुद्धा शिवप्रेमी करत आहेत. याच गडाच्या अनेक ऐतिहासिक बुरुज आणि वास्तू दिवसेंदिवस ढासळत चालल्या आहेत तर काही ढासळण्याच्या मार्गावर आहेत.

vishalgad2

(हेही वाचा भायखळ्यात शिवसैनिकांच्या गाडीवर हल्ला, उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला इशारा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.