कोल्हापुरात GBS चा दुसरा बळी; राज्यातील रुग्णांचा आकडा १२ वर

73
कोल्हापुरात GBS चा दुसरा बळी; राज्यातील रुग्णांचा आकडा १२ वर

पुणे आणि मुंबईत जीबीएसने (GBS) थैमान घातले आहे. जीबीएसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढते तसंच मृतांचा आकडा देखील वाढत आहे. अशामध्ये कोल्हापुरमध्ये आता जीबीएसने दुसरा बळी घेतला आहे. तर शनिवारी (१५ फेब्रुवारी) सांगलीमध्ये दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यातील जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा १२ वर पोहचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीबीएस (GBS) आजाराने कोल्हापुरमध्ये दुसरा बळी घेतला आहे. रेंदाळ ढोणेवाडी येथे राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तींचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णावर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर कोल्हापुरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात जीबीएसच्या (GBS) ५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामधील एक जण व्हेंटिलेटरवर आहे.

(हेही वाचा – New Delhi Railway Station Stampede : ‘रेल्वेची ती एक सूचना आणि…’ ; हमालाने सांगितलं नेमकं काय घडलं?)

जीबीएस (GBS) या आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा सांगलीत मिरजमध्ये शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यातील एक रुग्ण 14 वर्षाचा मुलगा होता, जो कर्नाटकातील हुक्केरी येथून सांगलीत उपचारासाठी आला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर दुसरी रुग्ण ही 60 वर्षीय महिला होती. या रुग्ण महिलेला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल केले होते. ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती. तिचा मध्यरात्री मृत्यू झाला आहे.

पुण्यामध्ये जीबीएसने (GBS) टेन्शन वाढलं आहे. जीबीएसच्या बाधित रुग्णांची संख्या २०८ वर पोहचली आहे. पुण्यात आज नव्याने एक बाधित रुग्ण सापडला. जीबीएस आतापर्यंत १२४ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून आज नव्याने एक रुग्ण सापडला. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या २०८ वर पोहोचली असून त्यातील १८१ रुग्णांची जीबीएसचे (GBS) निदान झाले आहे. व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्यांची संख्याही दररोज कमी-अधिक होत आहे. दरम्यान, पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहे. शहरात दररोज जीबीएस बाधित रुग्णसंख्या वाढत असून रविवारी तपासणी होत नसल्यामुळे बाधित रुग्णसंख्य कमी दिसते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.