बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण (Santosh Deshmukh Case) हत्येने राज्य हादरले आहे. अशातच आता परळीजवळ अजून एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे. परळीजवळ एका टिप्परने दुचाकीस्वार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना उडवल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Sarpanch Accident)
(हेही वाचा – Bandra येथील धर्मांधांच्या अनधिकृत बांधकामांना उबाठाचे अभय; नेत्यांचे प्रशासनावरच आरोप)
मिळालेल्या माहितीनुसार, अभिमन्यू क्षीरसागर हे सौंदाना (saundana) गावाचे सरपंच आहेत. सरपंच अभिमान क्षीरसागर हे परळीवरून शनिवारी रात्री काम आटपून दुचाकीने गावाकडे निघाले होते. मिरवट येथे त्यांच्या दुचाकीला टिप्परनं धडक दिली. यावेळी अभिमन्यू क्षीरसागर जोरात धडक बसल्याने रस्त्याच्या कडेला पडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि, क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.या अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. सरपंच क्षीरसागर यांच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच घटनास्थळी परळी (Parli) ग्रामीण पोलीस दाखल झाले. हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करत असून अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात हलवण्यात आला.
बीडमधील राखेचे अवैध व्यवसाय होत असल्याचे आरोप होत असताना सरपंचाचा अपघाती मृत्यू झाल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे.त्यानुसार हा अपघात की घात होता, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता आणखी एका सरपंचाचा भरधाव टिप्परनं दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. (Sarpanch Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community