The Kerala Story : चित्रपट पाहिल्यावर उच्च शिक्षीत हिंदू तरुणीने १२वी नापास मुसलमान प्रियकराला पाठवले गजाआड

इंदूरमध्ये 'द केरळ स्टोरी' चित्रपट पाहिल्यानंतर एका तरुणीने धर्मांतर करण्यापासून आपले पाऊल मागे घेतले.

201

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटामुळे अनेक वादविवाद झाले आहेत. मात्र या चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. दरम्यान, हा चित्रपट पाहून आलेल्या एका हिंदू तरुणीने तिच्या मुसलमान प्रियकराविरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल केली. माझा प्रियकर माझ्यावर मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत आहे. तसेच धर्मांतर न केल्यास भाऊ आणि आईला मारण्याची धमकी देत आहे, असा आरोप या तरुणीने तक्रारीमधून केला आहे.

इंदूरमध्ये ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर एका तरुणीने धर्मांतर करण्यापासून आपले पाऊल मागे घेतले. तसेच तिने धर्मांतरासाठी दबाव आणणाऱ्या तिच्या परधर्मीय प्रियकराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार एका तरुणासोबत तिची मैत्री झाली होती. त्या तरुणी कोचिंगसाठी जात असताना तिथे त्यांची मैत्री झाली. त्यानंतर तिचे ब्रेनवॉश करण्यात आले. त्यानंतर ती कुटुंबियांपासून वेगळी राहू लागली. या दरम्यान, या तरुणाने तिच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच धर्मांतरासाठी मारहाणही केली, असा आरोप तिने केला.

(हेही वाचा Azad Maidan Riot : तपासातील कुचराईमुळेच दंगलखोर मुसलमानांची हिंमत वाढली)

दरम्यान, धर्मांतर न केल्यास तिच्या भावाला आणि आईला ठार मारण्याची धमकीही दिली. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट आला तेव्हा या तरुणीने हा चित्रपट पाहण्यासाठी या प्रियकराकडे आग्रह केला. मात्र त्याने त्यास नकार दिला. पुढे तो कसाबसा चित्रपट पाहायला तयार झाला. मात्र चित्रपट पाहून झाल्यावर या तरुणीने ही कहाणी तर माझ्यासारखीच आहे, असे त्याला सुनावले. तसेच आपण धर्मांत करणार नसल्याचेही तिने बजावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण आणि तरुणी काही काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, केरळ स्टोरी चित्रपट पाहिल्यानंतर तरुणीने तक्रार दिली. त्या आधारावर या तरुणाविरोधात बलात्कार, धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम, यासह अनेक गंभीर कलमांसह गुन्हा दाखल करून पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. आरोपी तरुण हा १२वी नापास आहे. तर तरुणी उच्चशिक्षित असून, खासगी कंपनीत कामाला आहे. तिच्या पगारातूनच हा तरुण खर्चासाठी पैसे घेत असे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.