Mumbai – Goa highway : सात तासांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत

131
Mumbai - Goa highway : सात तासांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai – Goa highway) चरवेली येथे गॅस टँकर उलटून वायुगळती झाल्यामुळे बंद पडलेली वाहतूक ७ तासांनी सुरू झाली आहे.

मुंबई – गोवा महामार्गावरील (Mumbai – Goa highway) हातखंब्यानजीक असलेल्या चरवेली येथील वळणावर गॅसचा टँकर उलटून वाहतूक गळती सुरू झाली. शनिवार ७ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने महामार्गावरील वाहतूक बंद केली. पूर्ण धोका टाळल्यावर सात तासांनी आज सकाळी वाहतूक सुरू करण्यात आली.

अपघातातील गॅस टँकर (क्र. यू.पी.-७० सीटी ९९९९) हा वळणावर डाव्या बाजूला उलटला. लोकांनी तातडीने त्या टँकरचा (Mumbai – Goa highway) चालक बिरपाल प्रेमणारायण सिंग (वय ५७, रा. उत्तर प्रदेश) याला बाहेर काढले. त्यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी आली होती. त्यातून चालकाला पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

(हेही वाचा – Amit Shah : उत्तम कायदा आणि सुव्यवस्था ही विकासाची पहिली अट)

या टँकरमधून वायुगळती (Mumbai – Goa highway) होत होती. त्यामुळे लागलीच अग्निशामक दल, एमआयडीसी रत्नागिरी नगर परिषद यांना फोन करून बोलावले. तसेच जिंदल कंपनीचा टँकर असल्याने त्यांना कळवले.

ही घटना रात्री साडेअकरा वाजता घडली. त्यानंतर तातडीने त्या महामार्गावरील (Mumbai – Goa highway) वाहतूक थांबवली. ती पालीजवळील बावनदीमार्गे वळवण्यात आली. जिंदाल कंपनीचे तंत्रज्ञही तातडीने घटनास्थळी आले व त्यांनी गळती बंद केली. त्यानंतर सकाळी ६.२५ ला सुमारे सात तासाने महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

हातखंबा महामार्गाचे पोलीस, पाली दूरक्षेत्राचे पोलीस, तसेच रत्नागिरी येथील ग्रामीण पोलीस रात्रभर घटनास्थळी होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.