Kumbh Mela Stampede : दुर्घटनेनंतर सरकारने उचलली पावले, VIP पास रद्द, वाहनांना प्रवेशबंदी

70
Kumbh Mela Stampede : दुर्घटनेनंतर सरकारने उचलली पावले, VIP पास रद्द, वाहनांना प्रवेशबंदी
Kumbh Mela Stampede : दुर्घटनेनंतर सरकारने उचलली पावले, VIP पास रद्द, वाहनांना प्रवेशबंदी

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर बुधवार, २९ जानेवारी या दिवशी मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. (kumbh mela 2025) त्या ठिकाणी ब्राह्म मुहूर्तावर १ ते २ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर उपाययोजनांचा अवलंब सुरु केला आहे. (Kumbh Mela Stampede)

(हेही वाचा – ऑगस्ट 2024 पासून बंद असलेली India-Israel flight सेवा 2 मार्चपासून पूर्ववत होणार)

दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून प्रत्येकी २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी न्यायालयीन आयोगाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या घोषणा
  • महाकुंभमेळा परिसरात वाहनांच्या ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत भाविकांना संगमावर पायी जाण्याची परवानगी असणार आहे.
  • प्रयागराज शहरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. शहरात फक्त दुचाकी, रुग्णवाहिका आणि अग्नीशमन दलाला प्रवेश दिला जाईल.
  • सर्व व्हिआयपी पास रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • सरकारने महाकुंभमेळा परिसरातील रस्ते वन-वे केले आहेत. आता स्नान केल्यानंतर भाविकांना दुसऱ्या मार्गाने परत पाठवले जाईल.
  • प्रयागराजला येणाऱ्या ८ प्रमुख सीमा बंद करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे गर्दी नियंत्रणात येण्यास मदत होईल. (Kumbh Mela Stampede)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.