कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिम अंतर्गत उपलब्ध लस साठ्याची मर्यादा लक्षात घेता आणि मोहिमेतील प्राधान्य लक्षात ठेवून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून लसीकरणाचे दैनंदिन नियोजन करण्यात येत आहे. १४ ते १६ मे २०२१ या कालावधीत तसेच १७ मे २०२१ रोजी तौत्के चक्रीवादळाच्या प्रभावाची शक्यता लक्षात घेता लसीकरण स्थगित करण्यात आले होते. मंगळवार, १८ मे २०२१ आणि बुधवार, १९ मे २०२१ रोजी मुंबईत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.
- वादळासह पावसाने प्रभावित झालेली काही लसीकरण केंद्रे मंगळवार, १८ मे २०२१ बंद राहणार आहेत. उद्या कार्यरत राहणा-या लसीकरण केंद्रांची यादी प्रसारमाध्यमे व समाज माध्यमांद्वारे नागरिकांच्या माहितीसाठी रात्री उशिरापर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल.
(हेही वाचा : ठाकरे सरकारला अधिकारी किंमत देईनात!)
- कोविशिल्ड लस देताना, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेनंतर किमान १२ ते १६ आठवडे (किमान ८४ दिवस) पूर्ण केलेल्यांनाच दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. त्यामुळे ६० वर्ष वयोगटातील नागरिक २४ मे २०२१ नंतर दुसऱया मात्रेसाठी पात्र राहतील.
- याअनुषंगाने १८ मे २०२१, १९ मे २०२१ या दोन्ही दिवशी कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेसाठी ६० वर्ष व त्यावरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर थेट (वॉक इन) जाऊन लस घेता येईल.
- लसीकरण मोहिमेच्या नियोजनास मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.