हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याने अनेक कट्टरतावाद्यांना आनंद झाला. (Israel-Palestine Conflict) पाकिस्तानपासून ते तालिबान आणि इराणने हमासच्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. इराण असो वा सौदी अरेबिया, हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. तालिबानही आता या लढाईत उडी घेण्यास घाबरले आहेत.
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : रात्रभर रॉकेटचा वर्षाव; इस्रायल आणि गाझा पट्टीच्या अवकाशात धुराचे लाेळ)
तालिबानची धमकावणारी मागणी
तालिबानने इराण, इराक आणि जॉर्डन या देशांना विनंती केली आहे की, त्यांनी तालिबानला इस्त्रायलपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग द्यावा. कारण त्यांचे लक्ष्य जेरुसलेम जिंकणे आहे. त्याचवेळी लेबनॉनमधील हिजबुल्लाह समर्थकांनीही हमासच्या या हल्ल्याचा उघडपणे आनंदोत्सव साजरा केला. हिजबुल्लाह समर्थकांनी हिजबुल्लाच्या झेंड्यासह पॅलेस्टिनी झेंडे फडकावले आणि समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तेथे उपस्थित असलेले अनेकजण ये-जा करणाऱ्यांना मिठाईचे वाटपही करत होते. (Israel-Palestine Conflict)
इस्रायलमधील कट्टरतावादी हिंसाचार
इतकेच नाही, तर काही अरबी कट्टरपंथीयांनी इस्रायलच्या उत्तर भागात गोंधळ घातला आणि रस्त्यांवर जाळपोळही केली. या हल्ल्यानंतर इस्रायलच्या ज्या भागात असे कट्टरपंथी मोठ्या संख्येने स्थायिक आहेत, तेथे तणाव वाढला आहे.
इस्रायलचा जोरदार पलटवार
हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने जोरदार पलटवार केला. इस्रायली सैन्याने गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर वेगाने हल्ले केले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हमासच्या हल्ल्यात 230 जण ठार झाले होते, तर इस्रायली लष्कराने प्रतिहल्ल्यामध्ये 300 हून अधिक हमास सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे. इस्रायलने हमासचा खात्मा होईपर्यंत ही कारवाई करण्याचे बोलले आहे. (Israel-Palestine Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community