बोपदेव घाटातील बलात्काराच्या (Bopdev Ghat Rape) घटनेनंतर पोलिसांना अजूनही आरोपींचा माग लागलेला नाही. यामुळे तपास पथकांची संख्या दहावरून २५ आणि आता ७० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरीही कोणतेच धागेदोरे मिळत नसल्याने पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी चक्क बदनाम म्हणून ‘साइड ब्रँच’ला वर्ग केलेल्या ४४ विस्थापितांना तपासासाठी पुन्हा ‘प्रस्थापित’ केले आहे.
त्यांना त्यांच्या जुन्या हद्दीत मुक्तपणे वावर करण्यास मोकळीक दिली आहे. त्यांचे चांगल्या-वाईट लोकांशी असलेले सगळे संबंध वापरुन या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे “बदनाम हुअे तो क्या हुआ काम तो आ गये’ असे म्हणत हे विस्थापित पुन्हा नव्या जोशाने कामाला लागले आहेत. (Bopdev Ghat Rape)
(हेही वाचा – Haryana Assembly Election : हरियाणात ५७ वर्षात पहिल्यांदाच असे घडले; भाजपची विजयी हॅट्रिक)
या प्रकरणी सात दिवसांत पोलिसांच्या तपासात थोडीशीही प्रगती झाली नाही. मागील काही वर्षांत पोलिसांचा तपास पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित झाला आहे. यामुळे खबऱ्यांचे जाळे आणि खबऱ्यांना जपणे हा पारंपरिक तपासाचा प्रकार जवळपास बंदच झाला आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज नाहीत, घटनास्थळी मोबाइलला रेंज नसल्याने घटनास्थळावरचा “डंम्प डेटा’ नाही. तसेच आरोपी कोणत्या वाहनाने आले, ते कोणत्या दिशेने गेले हे हे पीडित तसेच फिर्यादीला माहिती नाही. (Bopdev Ghat Rape)
तर, ताब्यात घेतलेल्या २०० सराईतांमध्ये एकही संशयित आढळलेला नाही. यामुळे तपास जवळपास ठप्प आहे. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपासाची आशा जवळपास सोडली आहे. त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या तपास पथकांना तसेच गुन्हे शाखेच्या तपास पथकांना पारंपारिक पद्धतीने तपास करण्याच आदेश दिले आहेत. (Bopdev Ghat Rape)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community