२१० एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर परिवहन मंत्री म्हणतात, आता लस द्या!  

लॉकडाऊनमध्ये सर्व ठप्प असतानाही लालपरी सेवा देत होती. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाने आपला जीव गमवावा लागला होता. मात्र इतके असून सुद्धा नेहमीच अन्याय होणाऱ्या या लालपरीच्या कर्मचा-यांना आता कोरोना लस मिळवण्यासाठी देखील हात पसरावे लागत आहे.

81

राज्यभरात एसटीच्या अंदाजे 210 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तसेच 9 हजार कर्मचारीबाधित झाले आहेत. मुंबई, पुणे असा शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली, मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली नाही. याचा परिणाम म्हणून हजारो कामगार बाधित झाले, आता बैल गेला आणि झोपा केला या म्हणीप्रमाणे परिवहन मंत्री अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटी कर्मचाऱ्यांना लस द्या, अशी विनंती करत आहेत. 

लसीसाठी कर्मचाऱ्यांना हात पसरावे लागले!

लॉकडाऊनमध्ये सर्व ठप्प असतानाही लालपरी सेवा देत होती. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाने आपला जीव गमवावा लागला होता. मात्र इतके असून सुद्धा नेहमीच अन्याय होणाऱ्या या लालपरीच्या कर्मचा-यांना आता कोरोना लस मिळवण्यासाठी देखील हात पसरावे लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ‘आम्हाला लस द्या’, अशी लेखी मागणी परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. त्याला उशिरा प्रतिसाद देत परिवहन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस द्यावी, अशी विनंती केली.

(हेही वाचा : आधीच वेतनाची बोंब आता ​लसही मिळेना! राज्यात ‘लालपरी’ दुर्लक्षित)

काय केली विनंती?

टाळेबंदीच्या काळात राज्यभरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनादेखील फ्रंट लाईन वर्कर (कोविड योद्धे)  समजून लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी विनंती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे  अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. एसटी महामंडळात सध्या सुमारे ९८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलिस कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी अशा अनेक अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासी सेवा देण्याचे काम एसटीचे कर्मचारी अव्याहतपणे करीत आहेत.  याबरोबरच गेली दीड वर्ष शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार लाखो परप्रांतीयांना राज्याच्या सीमेपर्यंत सुरक्षित नेऊन सोडणे, हजारो विद्यार्थ्यांना परराज्यातून महाराष्ट्रात त्यांच्या घरी सुखरूप आणून सोडणे, हजारो ऊस तोडणी कामगारांना कारखान्यापासून त्यांच्या घरी पोचवणे, तसेच अत्यावश्यक सेवेतील अन्नधान्य, शेतीमाल व इतर मालवाहतुकीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणे, वैद्यकीय ऑक्सिजन टँकरसाठी, तसेच शासकीय रुग्णावाहिकेसाठी चालक पुरवणे असे विविध कामांमध्ये एसटी कर्मचारी आतापर्यंत अग्रेसर राहिले आहेत. त्यासाठी त्यांना अनेकदा आपल्या कुटुंबापासून लांब जावे लागते, रहावे लागते. प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांशी त्यांचा संपर्क येतो. तसेच शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची RT-PCR चाचणी करणे आवश्यक केले आहे. या सगळ्याचा विचार करता, संबंधित एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन त्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशी विनंती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अनिल परब यांनी केली आहे. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.