मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर Coastal Road चा दुसरा बोगदा मार्गही खुला

198
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर Coastal Road चा दुसरा बोगदा मार्गही खुला

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाअंतर्गत मरीन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली परिसर असा उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे ६.२५ किलोमीटर लांबीचा मार्ग खुला झाला आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करून प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाली अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल. (Coastal Road)

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंतच्या टप्प्याची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोमवारी १० जून २०२४ पाहणी केली. मरीन ड्राईव्ह येथून सुरू होणाऱ्या भूमिगत बोगद्यातून त्यांनी खुल्या कारमधून प्रवास केला. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम यांच्यासह विविध मान्यवर या दौऱ्यास उपस्थित होते. (Coastal Road)

(हेही वाचा – Mumbai: सिग्नल चुकला, गोरेगावकर निघाले वाशीला)

मरीन ड्राईव्ह येथून सुरू होणाऱ्या भूमिगत बोगद्यात थांबून वाहनधारकांसाठी बसविण्यात आलेल्या आपत्कालीन दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, तसेच सकार्डो प्रणाली, बोगद्यातील प्रकाश व्यवस्था आदींची माहितीही शिंदे यांनी जाणून घेतली. त्यानंतर शिंदे, फडणवीस, पवार यांनी संपूर्ण बोगद्यात प्रवास करीत पाहणी केली. यापूर्वी पहिल्या बोगदा मार्ग खुला करण्यात आला आहे. (Coastal Road)

‘धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे मुंबईकरांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी यामुळे मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच मुंबई किनारी रस्त्याची उत्तर वाहिनी मार्गिका खुली केल्यामुळे शहर विभागातील वाहतूक अधिक वेगवान होणार आहे. सुमारे पाऊण तासांचे अंतर अवघ्या काही मिनिटांत कापता येणे शक्य होणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. (Coastal Road)

दुसरी मार्गिंका खुली केल्याने असा होणार प्रवास

मरीन ड्राइव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने प्रवेश केल्यानंतर अमरसन्स उद्यान आंतरमार्गिकेने बाहेर पडता येईल. तर, अमरसन्स उद्यान आंतरमार्गिकेने प्रवेश केल्यानंतर दक्षिण बाजूस मरीन ड्राइव्हकडे तर उत्तर बाजूस बॅरिस्टर रजनी पटेल चौक व वत्सलाबाई देसाई चौकाकडे जाता येईल. मरीन ड्राइव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने प्रवेश केल्यानंतर हाजी अली येथील आंतरमार्गिकेवरुन बॅरिस्टर रजनी पटेल चौक (लोटस जेट्टी परिसर) येथून पुढे वरळी, वांद्रेकडे मार्गक्रमण करता येईल. (Coastal Road)

मरीन ड्राइव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने प्रवेश केल्यानंतर हाजी अली येथील आंतरमार्गिकेवरुन वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली चौक) येथून पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे मार्गक्रमण करता येईल. तसेच उत्तर दिशेला प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे याकरिता पुढील टप्प्यात बिंदूमाधव ठाकरे चौकापर्यंतचा किनारी रस्ता १० जुलै २०२४ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्या दिशेने कामे सुरू आहेत. (Coastal Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.