कोरोनामुळे राज्यभरातील व्यवहार ठप्प होते, तसेच प्रार्थनास्थळेही बंद होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्यामुळे प्रार्थनास्थळे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने नवरात्रीच्या वेळी घेतला होता. मात्र तरीही प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर बंदच होते. प्रत्येक सहा महिन्यांनंतर येणाऱ्या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर हे मंदिर उघडण्यात आले. त्यामुळे मंगळवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत बऱ्याच गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले.
(हेही वाचा चर बुजवण्याच्या कामांची कंत्राट निविदा होणार रद्द?)
सोमवारी रात्री दीड वाजल्यापासून श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंंत मंदिर भाविकांना दर्शनसाठी खुले राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर राज्यातील काही मंदिरे उघडण्यात आली, मात्र सिद्धिविनायक मंदिर बंदच होते. परंतु अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर सिद्धिविनायकाचे मंदिर उघडण्यात आले.
कोरोना नियमांचे पालन सक्तीचे
कोरोनाच्या नियमांचे पालन करून सिद्धिविनायक मंदिर खुले करण्यात आले आहे, भाविकांना ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे मंदिरात प्रवेश दिला जाईल, अडीच हजार भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनाला सोमवारी रात्री 1:30 वाजता सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला.
Join Our WhatsApp Community