‘या’ अकरा बँकांनी वाढवले व्याजदर

110

आरबीआयने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर, देशभरातील बॅंकांकडून गहू आणि वाहन कर्जासह सर्व कर्जे महाग करण्यात आली आहेत. खासगी क्षेत्रातील HDFC बॅंकेसह ICICI Bank, PNB Bank, Bank of India आणि इतर अनेक बॅंकांनी व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे कर्जाचा EMI वाढणार आहे.

HDFC चेही गृहकर्ज महागले

देशातील सर्वात मोठी गृह वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेडने तिच्या कर्जदरात 50 आधार बिंदूंनी वाढ केली आहे. त्यामुळे कंपनीच्या विद्यमान कर्जदारांना वाढीव हप्ता येणार आहे.

ही व्याज दर वाढ शुक्रवार 10 जूनपासून लागू करण्यात आली आहे. याआधीही बॅंकेने 9 मे 2 मे रोजी व्याजदरात अनुक्रमे 0.30 टक्के आणि 0.05 टक्क्यांनी वाढ केली होती.

35 दिवसांत रेपो दर 0.90 टक्क्यांनी वाढला

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने दोन महिन्यांत दुस-यांदा रेपो दर 0.50 टक्क्यांनी वाढवून 4.90 टक्के केला आहे. 4 मे रोजीही रेपो दर 0.40 टक्क्यांनी वाढवण्यात आला होता.

35 दिवसांत रेपो दर 0.90 टक्क्यांनी वाढला आहे. या वाढलेल्या व्याज दराचा फटका बॅंका आता थेट ग्राहकांवर टाकत असून, यामुळे EMI आणखी वाढणार आहे.

( हेही वाचा: शब्द देऊन ‘या’ आमदारांनी दगाबाजी केली; राऊतांनी वाचून दाखवली नावांची यादी )

या 11 बॅंकांनी वाढवले व्याजदर

PNB, Bank of India, Bank of Baroda, ICICI Bank, central bank of India, Federal bank, RBAL bank, HDFC bank, bank of Maharashtra, SBI, canara Bank.

महागाई वाढणार

वर्षभर महागाई वाढत जाण्याची शक्यता आरबीआयने व्यक्त केली आहे. देशाला कच्चे तेल 75 डाॅलर प्रति बॅरल या दराने परवडते. मात्र आता ते 125 डाॅलरवर पोहोचल्याने महागाई नियंत्रणाता आणणे आव्हानात्मक झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.