हार्बर रेल्वेवरील नेरुळ रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने हे सेवा पनवेल ते नेरूळपर्यंत ठप्प झाली होती, ती सुरु होत नाही तोच आता पश्चिम रेल्वे (Western Railway) विस्कळीत झाली आहे.
तांत्रिक बिघाड झाल्याने चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. जवळपास पाऊस तासापासून पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अचानक पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवा (Western Railway) विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. सकाळी नेरुळ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल रखडल्या होत्या. जवळपास एका तासापासून अनेक गाड्या मध्येच रेल्वे ट्रॅक आणि स्थानकात उभ्या होत्या. हार्बर लाईन ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. 60 ते 70 मिनिटांनंतर हार्बर रेल्वेवरील लोकल सुरळीत झाल्या.
(हेही वाचा ED ने दिल्लीऐवजी कोलकातामध्ये यावे, अशी मागणी करणारी TMC चे अभिषेक बॅनर्जी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली )
पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर (Western Railway) 35 दिवासांचा मेगाब्लॉक (Megablock) सुरु आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 6 ऑक्टोबर या कालावधीत हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. गोरेगाव-कांदिवली विभाग हा वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गाचा भाग आहे. वांद्रे टर्मिनस-बोरिवलीदरम्यान पाचवी मार्गिका आणि खार रोड-गोरेगावदरम्यान सहावी मार्गिका सुरु झाली आहे. आता गोरेगाव कांदिवलीदरम्यान 4.5 किमी लांबीच्या सहाव्या मार्गाचे काम सुरु होणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान जवळपास 600 ते 700 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community