Tansa Lake : तुळशी तलावापाठोपाठ तानसा तलावही भरले

2857
Tansa Lake : तुळशी तलावापाठोपाठ तानसा तलावही भरले
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलावा पाठोपाठ बुधवारी तानसा तलावही भरुन वाहू लागले. मागील वर्षी २६ जुलै रोजी तानसा तलाव भरुन वाहू लागले होते, परंतु यंदा दोन दिवस आधीच हे तलाव भरले गेले. बुधवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास याचे तीन दरवाजे उघडले गेले. त्यातून  ३३१५ क्युसेस एवढा पाण्याचा विसर्ग चालू आहे. (Tansa Lake)

बुधवारी सकाळी घेतलेल्या तलावातील पाण्याच्या पातळीच्या आढाव्यानुसार तानसा तलावातील पाण्याचा साठा ९६ टक्के जमा झाला होता. या तलावात आता १ लाख ३९ हजार ६५१ दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा साठा जमा झाला होता. तर दुपारी हा पाण्याचा साठा १ लाख ४५ हजार दलशक्ष लिटर्स एवढा जमा झाला. मागील आठवड्यात तुळशी तलाव भरुन वाहिले होते, आता तानसा तलाव भरल्याने दोन तलाव भरले गेले आहेत. आता विहार तलावाची पातळीही वाढली असून यामध्ये बुधवारी सकाळी ९३. १४ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या दिवसांत विहार तलावही भरले जाईल. मागील वर्षी  २६ जुलै २०२३ रोजी मध्यरात्री विहार तलाव भरले होते, त्याच दिवशी पहाटे तानसा तलावही ओसंडून वाहू लागला होता. (Tansa Lake)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. बुधवारी पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८४,१३९ कोटी लीटर ( ८,४१,३९६ दशलक्ष लीटर) इतका पाण्याचा साठा उपलब्ध आहे. मुंबई महानगराच्या वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर गरजेच्या तुलनेत हा साठा ५८.१३ टक्के इतका आहे. (Tansa Lake)

(हेही वाचा – Dharavi : सर्वेक्षण प्रक्रियेत बाधा आणणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात स्थानिक आक्रमक)

तानसा तलावाची एकूण क्षमता : १४,४९४.६ कोटी लीटर (१४४,९४६ दशलक्ष लीटर)

हा तलाव यापूर्वी कधी भरला होता

  • २६ जुलै २०२३ पहाटे ४.३० वाजता
  • १४ जुलै २०२२ रात्री ८.५० वाजता
  • २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता
  • २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता (Tansa Lake)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.