कंगनाची आता ‘koo’वर टिवटिव! स्वदेशी अ‍ॅपकडून स्वागत!

या अ‍ॅपचे संचालक अप्रमेय राधाकृष्णन यांनी कंगनाचे जोरदार स्वागत केले. तिने 'Koo'ला स्वत:च्या घरासारखे आणि अन्य अ‍ॅपला भाड्याचे म्हटले होते. जे अगदी योग्य आहे,' असे राधाकृष्णन यांनी म्हटले आहे. 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर तिथे जो हिंसाचार भडकला त्यावर ट्वीट केल्यावर अभिनेत्री कंगणा राणावत हिचे ट्विटर अकाउंट ट्विटरने रद्द केले. त्यामुळे कंगनाचे लाखो चाहते नाराज झाले होते. त्यानंतर लागलीच कंगनाला भारतनिर्मित ‘koo’ या अ‍ॅपने तिच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत आणि कंगनानेही त्याचा स्वीकार केला आहे. भाड्याचे घर शेवटी भाड्याचे असते आणि आपले घर आपलेच असते…’, असे कंगनाने म्हटले आहे.

काय आहे ‘koo’ अ‍ॅप?

  • ‘koo’ हे ट्विटरसारखे एक अ‍ॅप आहे. या अ‍ॅपला आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंजचा अवार्डही मिळाला आहे.
  • हे अ‍ॅप अप्रमेय राधाकृष्णन आणि मयांक बिडवटका यांनी हे विकसित केले आहे.
  • हिंदी, तेलगू, कन्नड, बंगाली, तामिळ, मल्याळम, गुजराती, पंजाबी, ओडिशी, आसामी अशा अनेक भाषेत ही अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे.
  • गुगल प्लेस्टोरवर या अ‍ॅपला ‘बिल्ट फॉर इंडियन्स’ म्हटले गेले आहे.
  • कनेक्ट विद इंडियन्स इन इंडियन लँग्वेज, अशी या अ‍ॅपची टॅगलाईन आहे.

काय म्हटले आहे कंगनाने? 

सर्वांना हॅलो, रात्री काम करतेय आणि सध्या धाकड क्रूचा लंच ब्रेक आहे. तेव्हा ‘कू’ का करू नये? ही माझ्यासाठी नवी जागा आहे, त्यामुळे समजण्यास थोडा वेळ लागले. पण भाड्याचे घर शेवटी भाड्याचे असते आणि आपले घर आपलेच असते…’ असे कंगनाने लिहिले होते.

(हेही वाचा : मोठी बातमी! मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द)

कंगनावर का केली कारवाई? 

गेल्या काही महिन्यांपासून कंगना ट्विटरवर दिवसरात्र व्यक्त होत होती. सोबत ट्रोलही होत होती. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर कंगनाने आक्रमकपणे भूमिका मांडली. तिचे प्रत्येक ट्वीट चर्चेत येत होते. त्यानंतर तिने ठाकरे सरकारवर टीका केली. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणातही मोठमोठ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना लक्ष्य केले होते. शेतकरी आंदोलनावरही तिने आक्रमक भूमिका घेतली होती. यादरम्यान तिच्या अनेक ट्विटने वादही ओढवून घेतले. काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनावरील कंगनाच्या बेताल ट्विटवर ट्विटरने कारवाई केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here