Kawad Yatra 2024 : उत्तर प्रदेशनंतर उत्तराखंडमध्येही विक्रेत्यांना नावाची पाटी अनिवार्य

दुकानदारांना पाटीवर लिहावी लागणार स्वतः ची नावे

174
Kawad Yatra 2024 : उत्तर प्रदेशनंतर उत्तराखंडमध्येही विक्रेत्यांना नावाची पाटी अनिवार्य

उत्तर प्रदेशप्रमाणेच आता उत्तराखंडमध्येही कावड यात्रेच्या मार्गावरील दुकानदारांना हॉटेल आणि ढाब्यांच्या दर यादीसोबत त्यांची नावे लिहावी लागणार आहेत. हरिद्वार पोलीस प्रशासनाने रेस्टॉरंट मालकांना असे आदेश जारी केले आहेत. हरिद्वारचे एसएसपी परमेंद्र डोबल यांनी सांगितले की, कावड यात्रेच्या मार्गावरील हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट किंवा रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांच्या मालकाचे नाव अनिवार्यपणे लिहावे लागेल. (Kawad Yatra 2024)

तसे न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. नुकतेच हरिद्वारमधील काही संघटनांनी पोलिसांसमोर मागणी केली होती की, कावड यात्रेच्या मार्गावर शिवभक्तांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दुकानदारांनी दुकानांवर त्यांची नावे निश्चितपणे लिहावीत. त्यानंतर आता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. एका ढाब्यावर जेवणात लसूण आणि कांदा दिल्याने झालेल्या गदारोळानंतर पोलिसांनी ढाबा आणि हॉटेलचालकांची बैठक घेतली. त्यात पोलिसांनी सांगितले की, कावड यात्रेदरम्यान ढाबे आणि हॉटेलमध्ये लसूण आणि कांद्याचे पदार्थ दिले जाणार नाहीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत मांसाहार तयार केला जाणार नाही अशी स्पष्ट ताकीद पोलिसांनी दिली आहे. (Kawad Yatra 2024)

(हेही पहा – विरोधकांच्या खोट्या प्रचाराला BJP देणार सडेतोड जवाब; 20 नेत्यांची तगडी टीम तयार)

महामार्गाने जातांना ‘न्यू इंडिया हॉटेल’, ‘स्टार बेकरी’ अशी नावे दिसतात. अनेक हिंदू या हॉटेलमध्ये जातात. उत्तरप्रदेश सरकारने आता ओळख लपवून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल मालकांचा बुरखा फाडला आहे. उत्तरप्रदेशातील (UP Government) कांवड यात्रेपूर्वी (Kawad Yatra 2024) मुजफ्फरनगरमध्ये अन्न, पेये आणि फळे विकणाऱ्या दुकानदारांना त्यांची नावे ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Kawad Yatra 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.