मुंबईतील रुग्णसंख्या मागील चार दिवसांपासून नियंत्रणात मंगळवारी, ८ जून रोजी संपूर्ण दिवसभरात जिथे ६७३ रुग्णांची नोंद झाली होती, तिथे बुधवारी त्यात वाढ होऊन ती ७८८ झाल्याचे आढळून आले. संपूर्ण दिवसभरात २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
२७ रुग्णांचा मृत्यू!
बुधवारी संपूर्ण दिवसभरात ७८८ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर संपूर्ण दिवसभरात २९ हजार ०८२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर बुधवारपर्यंत १५ हजार ७८३ रुग्णांवर उपचार सरु आहेत.मंगळवारी ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथेबुधवारी २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १५ रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे आहेत. यामध्ये १९ पुरुष आणि ८ महिला रुग्णाचा समावेश होता. यामध्ये ६० वर्षांवरील १४ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ८ एवढी होती. तर ४० वर्षांखालील मृतांची रुग्ण संख्या ५ इतकी होती. सोमवारी, ७ जूनपासून मुंबईत अनलॉक सुरु झाले, अशा वेळी रुग्ण संख्या कमी होत आहे, हे सकारात्मक बाब आहे.
(हेही वाचा : कोविडला रोखणारा ‘मुंबई पॅटर्न’ आता दिल्लीतही राबवणार)
रुग्ण दुपटीचा दर ५५३ दिवसांवर आला!
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५५३ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ६२ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ही २८ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community