रविवारी अकरा हजारांच्या घरात गेलेली कोरोना बाधित रुग्णांची संख्य मागील दोन दिवसांपासून दैनंदिन दहा हजारांवर स्थिरावली आहे. सोमवारी ९,८५७ एवढी रुग्ण संख्या होती, तर मंगळवारी ही रुग्णसंख्या पुन्हा १०,०३० एवढी आढळून आली आहे. मागील दोन दिवसांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली पाहायला मिळत असून विशेष म्हणजे मंगळवारी तब्बल ७,०१९ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत, ही आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे.
मृत्यूचा आकडा चाळीशीच्या घरात पोहोचला!
मंगळवारी दिवसभरात १० हजार ३० रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात ३१ रुग्णांचे मृत्यू झाले. मागील काही दिवसांपासून मृत्यूची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. विशीच्या घरात असलेला मृत्यूचा आकडा तिशी पार होवून चाळीशीच्या घरात जावून पोहोचला आहे. दिवसभरात ४७ हजार ९२२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमधून दहा हजार रुग्ण आढळून आले असून दिवसभरात ७ हजार १९ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.
(हेही वाचा : कोरोना चाचण्यांसाठी काय आहे नवी नियमावली?)
७३ कंटेन्मेंट झोन झाले!
मंगळवारी मृत्यू पावलेल्यांमध्ये ३१ जणांपैकी १९ जणांना दिर्घकालिन आजार होता. यामध्ये २० रुग्ण आणि ११ रुग्ण महिलांचा समावेश आहे. यामधील २० रुग्णांचे वय हे चाळीस वर्षांपुढील आहे, ८ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील आणि ३ रुग्णांचे वय हे चाळीशीच्या खालील होते. संपूर्ण मुंबईत मंगळवारपर्यंत ७३ कंटेन्मेंट झोन होते, तर ७४० इमारती सक्रिय सीलबंद करण्यात आल्या होत्या. दिवसभरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या अति जोखमीच्या संपर्कातील ३२ हजार ९२८ लोकांचा शोध घेण्यात आला आहे. त्यातील दिवसभरात १०३७ संशयित रुग्णांना सीसीसी वनमध्ये दाखल करण्यात आले.
Join Our WhatsApp Community