प्रलंबित मागण्यासाठी मंत्रालयातील (Mantralay) संरक्षण जाळीवर उडी मारण्याचे प्रकार सध्या वारंवार घडत आहेत. मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी एका कंत्राटी शिक्षकाने कायमस्वरूपी नोकरी द्यावी या मागणीसाठी मंत्रालयातील जाळीवर उडी मारून आंदोलन केले.
राज्यात शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने होत आहे. मात्र कायम स्वरूपी शिक्षकाची नोकरी मिळावी या मागणीसाठी रणजित आव्हाड या तरुणाने थेट मंत्रालयातील (Mantralay) संरक्षण जाळीवर उडी मारली. बीड जिल्ह्यात आंबेजोगाई येथे राहणारा हा तरुण कंत्राटी पद्धतीत शिक्षक म्हणून काम करतो. त्याची घरची परिस्थिती बेताची आहे. त्याच्या घरात कुणीही नोकरीला नाही. त्यामुळे त्याला कायमस्वरूपी भरती करण्यात यावी या मागणीसाठी त्याने हे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांना मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्या तरुणाला जाळीच्या बाहेर काढावे लागले. आता पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
(हेही वाचा BCCI Revenue : महिलांच्या आयपीएलमधून बीसीसीआयला ३७७ कोटींचा महसूल )
Join Our WhatsApp Community