आज म्हणजेच रविवार २२ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा बारामती मध्ये एका शिकाऊ विमानाचा अपघात (PLANE CRASH) झाला आहे. या अपघातात वैमानिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अधिक माहितीनुसार, बारामती येथील रेड बर्ड कंपनीचे विमान सकाळी सात वाजेच्या सुमारास जुना सह्याद्री काऊ फार्मनजिक असलेल्या लोखंडे वस्तीच्या वरील बाजूस अपघातग्रस्त झाले. हे विमान व्हीटी आरव्हीटी टेक्नम या जातीचे दोन सीटर असलेले हे विमान एका शेतात अचानक (PLANE CRASH) कोसळले. दोनच दिवसांपूर्वी याच रेड बर्ड कंपनीचे विमान बारामती विमानतळानजिक अपघातग्रस्त झाले होते. आज पुन्हा दुसरा अपघात झाल्यानंतर वैमानिकांसह विमानतळानजिक असलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
बारामतीत विमान प्रशिक्षण संस्थेचे शिकाऊ विमान कोसळले आहे. ही घटना गुरुवार (१९ ऑक्टोबर) घडली. कटफळ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर हा अपघत घडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या विमानाने बारामतीतील विमानतळावरून टेकऑफ घेतले होते. काही वेळानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले. (PLANE CRASH)
(हेही वाचा – Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दुसरी आत्महत्या)
गेल्या काही वर्षांपासून बारामतीत विमान प्रशिक्षण संस्था त्यांचे प्रशिक्षण कार्यालय चालवत आहेत. यासाठी बारामतीतील विमानतळाचा वापर होतो. काही महिन्यांपूर्वीच इंदापूर तालुक्यातील एक शिकाऊ विमान (PLANE CRASH) कोसळले होते. यावेळी विमानाचे नुकसान झाले होते. ती घटना ताजी असतानाच आता दुसऱ्या एका प्रशिक्षण संस्थेचे विमान कोसळले आहे.
या अपघातात (PLANE CRASH) वैमानिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बारामतीत सुरु असलेल्या प्रशिक्षण संस्थेचा गेल्या काही दिवसातील हा पाचवा अपघात आहे. काही महिन्यांपूर्वी मेखळी येथे नीरा नदीच्या पुलाखालून विमान घालण्याच्या नादात अपघात झाला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community