चुकीचे मीटर रीडिंग खपवून घेतले जाणार नाही; एजन्सीजना महावितरणाचा इशारा

मीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे सोपी व वेगवान झाली आहे. मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना मोबादला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे, असे प्रकार होत असल्यास, ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी दिला आहे.

विजय सिंघल हे दर पंधरवड्याला प्रामुख्याने अचूक मीटर रीडिंग संदर्भात आढावा घेत आहेत. मुख्यालयासोबतच क्षेत्रीय स्तरावरील विविध उपाययोजना तसेच कामात कुचाराई करणा-या एजन्सीविरुद्ध सुरु असलेली कारवाई यामुळे अचूक मीटर रीडिंगमध्ये सुधारणा झाली आहे. ग्राहकांना रीडिंगनुसार, वीज वापराचे योग्य वीजबिल मिळत असल्याने, त्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व बिल दुरुस्तीचा त्रास तसेच महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणा-या एजंसीविरुद्ध कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

( हेही वाचा: उद्धव ठाकरेंना ‘शिवसेना पक्षप्रमुख’ का म्हटले नाही? या प्रश्नावर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे )

वीजगळती कमी

वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहक हिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग देण्यात आला आहे. यात बिलिंगसाठी वीज मीटरच्या अचूक रीडिंगला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here