Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी स्वीकारली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

119
Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी स्वीकारली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड आणि नामदेव वाघमारे या दोन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी (Dhananjay Munde) कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. यवतमाळ दौऱ्यावर असताना मुंडे यांनी ही माहिती दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचे कुटुंबिय (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी यवतमाळमध्ये आले होते. धनंजय मुंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. शेतकरी नवरा तर गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, असा प्रश्न विचारत त्या भगिनीने हंबरडा फोडला. त्यात शासनाची मदतही अद्याप मिळाली नसल्याचे तिने धनंजय मुंडे यांना सांगितले. तात्काळ धनंजय मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना फोन लावून या दोन्ही कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्याची मदत देण्याचे निर्देश दिले.

(हेही वाचा – Sharad Pawar : I.N.D.I.A संदर्भातील बैठकीला पवारांची दांडी; ‘ज्युनिअर टीम’ पाठवून दिला सूचक इशारा)

माझे दार २४ तास उघडे

आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर कुटुंबापुढील प्रश्न आणखी वाढतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून कुठल्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत, असे भावनिक आवाहनही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.