राज्यात गारपीटीचा मारा; कोणत्या जिल्ह्यांत शेतीचे झाले नुकसान?

90

राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या पाठीवर अवकाळीने, गारपीटीने चाबूक ओढला आहे. ११ एप्रिलला झालेल्या गारपीटीत विशेषत: धाराशीव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. जिल्ह्यातल्या वाडीबामणी गावातल्या एका शेतकऱ्याचं फक्त एका तासात तब्बल २५ लाखाचं नुकसान झालं आहे.

दोन तपांमध्ये असा अवकाळी पाऊस पडल्याची नोंद नाही. १९८५ – ९० च्या काळात अशा स्वरूपाचा धुंवाधार पाऊस आणि गारपीट झाली होती. कृषीमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यानी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहाणी केली. कोणाला तात्काळ शबरी घरकुल योजनेमधून घर बांधून मिळणार आहे, तर कुणाला आर्थिक मदत मिळणार आहे. मागच्या दोन तीन महिन्यांत राज्यभरात पडणाऱ्या अवकाळीने शेतकऱ्याचं जगणं मुश्किल केलं आहे.

कोणत्या जिल्ह्यांचे झाले नुकसान?

  • बीड
  • नाशिक
  • धाराशीव
  • नागपूर
  • बुलढाणा
  • अमरावती
  • वर्धा
  • जालना
  • छत्रपती संभाजीनगर
  • अहमनगर

फक्त नाशिकला समोर ठेवलं तरी डोळे पांढरे होतील. या जिल्ह्यातील कांद्याचे ५८१४ हेक्टर क्षेत्र बाधित झालं, डाळिंबाचं ७७३ हेक्टर आणि ७५५ हेक्टरवर पसरलेल्या द्राक्ष बागेचं नुकसान झालं आहे. प्रत्येक एकरामागे जवळपास ४०,००० ते ५०,००० खर्च केलेला शेतकरी जेव्हा उभ्या पिकाला नेस्तनाबूत झालेलं पाहतो तेव्हा तो सरकारच्या आश्वासनांवर धग धरेल?

(हेही वाचा बाबरीच्या वक्तव्यावरून मनसेही आक्रमक! ट्विटरवर शेअर केला राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ)

कोणत्या पिकांचं झालं नुकसान?

  • कांदा
  • डाळिंब
  • द्राक्ष
  • गहू
  • भाजीपाला
  • हरभरा
  • ड्रॅगन फ्रुटसह
  • टरबूज
  • ऊस
  • सोयाबीन
  • टोमॅटो

उन्हाळ्यात गारपीट का होते?

काही वर्षांपूर्वी गारपीट फक्त पावसाच्या महिन्यांमध्ये होत असायची. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत गारपीट व्हायला सुरुवात झाली. हवामान शास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.