अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) मैदानात बीकेसी स्थानकाच्या कामाला सुरुवात झाली आहे. रस्ते सपाटीपासून 32 मीटर खोल खोदकाम करून या स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे.
नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHRCL) वांद्रे-कुर्ला संकुलातील ४.८ हेक्टर जमीन बांधकामासाठी कंत्राटदाराकडे सुपूर्द केली आहे. जमिनीच्या तांत्रिक तपासणी आणि माती परीक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. ”बॉटम अप” पद्धतीचा अवलंब करून या स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. जमिनीच्या पातळीपासून खोदकाम करून लगेचच त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.या स्थानकासाठी ३२ मीटरपर्यंत खोली असल्याने साधारण १८ लाख घनमीटर माती काढण्याचे नियोजन आहे, अशी माहिती एनएचआरसीएलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दररोज 6 हजार श्रमिकांची गरज निर्माण होणार
जमिनीखालील काम सुरक्षितपणे करण तसेच माती कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी मदत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंत्रणेत १७ ते २१ मीटर खोलीपर्यंत एकूण ३ हजार ३८२ सेकंट पाइल बसविण्यात आले आहेत. दर २.५ ते ३.५ मीटरपर्यंत अँकर आणि वॉलर्समुळे पाइलला आणखी बळकटी मिळणार आहे. सध्या ५५९ मजूर आणि पर्यवेक्षक रात्रंदिवस काम करत आहेत. प्रकल्पातील पुढील टप्प्यात दररोज 6 हजार श्रमिकांची गरज निर्माण होणार आहे. पहिला टप्पा (सी १)- वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई बुलेट स्थानकाचा आराखडा आणि भुयारी स्थानक-टर्मिनसची ४.८५ हेक्टर जागेत निर्मितीचे काम करण्यात येणार आहे.
हेही पहा –