Ahmednagar Commissioner Bribery : लाचखोरी भोवली; एसीबीच्या कारवाईनंतर अहमदनगर आयुक्त पंकज जावळे फरार

लिपिक शेखर देशपांडे (Shekhar Deshpande) यांच्यामार्फत त्यांनी ही लाच मागितली होती. एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तांसह लिपिक फरार झाले आहेत.

169
Ahmednagar Commissioner Bribery : लाचखोरी भोवली; एसीबीच्या कारवाईनंतर अहमदनगर आयुक्त पंकज जावळे फरार
Ahmednagar Commissioner Bribery : लाचखोरी भोवली; एसीबीच्या कारवाईनंतर अहमदनगर आयुक्त पंकज जावळे फरार

अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे (Dr. Pankaj Jawale) यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विरोधी विभागाने मोठी कारवाई केली असून त्यांचे रहाते घर सील केले आहे. बांधकाम परवानगी देण्यासाठी अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी 8 लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. याच प्रकरणात 19 आणि 20 जून रोजी ही लाच मागितली होती. (Ahmednagar Commissioner Bribery)

(हेही वाचा – Financial Audit Report : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर; अर्थव्यवस्था 7.6 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज)

आयुक्तांचे रहाते घर सील

लिपिक शेखर देशपांडे (Shekhar Deshpande) यांच्यामार्फत त्यांनी ही लाच मागितली होती. एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तांसह लिपिक फरार झाले आहेत. या प्रकरणात एसीबीने डॉ. पंकज जावळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हाण नगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला आहे, तर आयुक्तांचे रहाते घर लाचलुचपत विभागाने सील केले आहे.

आठ लाख रुपये मागितली लाच

एसीबीच्या कारवाईनंतर आयुक्त फरार झाले असून त्यांच्या कार्यालयाबाहेर लाचलुचपत विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून एसीबीने ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसंबंधीची मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे. लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त पंकज जावळे यांनी लिपिक देशपांडे यांच्यामार्फत आठ लाखांची लाच मागितली होती. त्यानुसार गुरुवारी ही लाच स्वीकारण्यात येणार होती. एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त आणि लिपिक दोघेही फरार झाले. महत्त्वाचे म्हणजे या दोघांनीही गुरुवारी शासकीय रजा टाकल्याची माहिती समोर आली आहे. (Ahmednagar Commissioner Bribery)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.