शनिवारपासून अहमदनगर- न्यू आष्टी डेमू सेवेची सुरुवात होणार

मध्य रेल्वेने अहमदनगर- न्यू आष्टी डेमू सेवा 24 सप्टेंबर 2022 पासून आठवड्यातून 6 दिवस (रविवार वगळता) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यू आष्टी येथून या डेमू (DEMU) सेवेचे उद्घाटन दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी 11 वाजता होणार आहे.

याचा तपशील खालीलप्रमाणे आहेतः –

  • 01401 अहमदनगर- न्यू आष्टी डेमू अहमदनगरहून रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस सकाळी ७.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १०.३० वाजता न्यू आष्टी येथे पोहोचेल.
  • 01402 न्यू आष्टी-अहमदनगर डेमू रविवार सोडून आठवड्यातून सहा दिवस न्यू आष्टी येथून सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी अहमदनगर येथे १३.५५ वाजता पोहोचेल.

थांबे : नारायणडोहो, न्यू लोणी, सोलापूरवाडी, न्यू धानोरा आणि कडा

संरचना : 10 कार डेमू

प्रवासी तिकिटे युटीएस (UTS) काउंटरद्वारे मेल/एक्स्प्रेससाठी लागू असलेल्या शुल्कानुसार स्थानकांवर बुक करू शकतात.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा, असे रेल्वेने सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here