अहमदनगरचे नामांतर Ahilyanagar; अधिसूचना जाहीर

109
अहमदनगरचे नामांतर Ahilyanagar; अधिसूचना जाहीर

महाराष्ट्र राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar) करण्याची अधिसूचना बुधवारी रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. याआधी औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धारशिव’ असे महायुती सरकारने बदलले होते. आता याच मालिकेत अहमदनगरचा समावेश करण्यात आला आहे. यामागे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कारणांचा समन्वय आहे.

अहमदनगरचे नाव बदलण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे इंदूरच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे ऐतिहासिक महत्त्व. त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानामुळे त्यांचा गौरव करण्यासाठी जिल्ह्याला त्यांच्या नावाने ओळखले जाण्याची मागणी होती. अहिल्याबाई होळकर यांनी धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मंदिरे, घाट आणि धर्मशाळा उभारण्याच्या कार्यात विशेष योगदान दिले होते आणि त्यांच्या कार्यामुळे त्या आजही देशभरात आदरणीय आहेत. (Ahilyanagar)

(हेही वाचा – India–Pakistan border : सीमेलगतच्या रस्त्यांचा विकास होणार, २,२८० किमी लांबी, ४, ४०० कोटींचा निधी; मोदी सरकारचा मोठा निर्णय)

राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नामांतराच्या या निर्णयांमागे राज्यातील महायुती सरकारची हिंदुत्ववादी भूमिका अधोरेखित होते. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरांप्रमाणेच, अहमदनगरचा नामांतर हा सरकारच्या हिंदुत्ववादी विचारधारेला समर्थन देणारा आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मरण आणि गौरव करण्याच्या धारणेतून हा निर्णय घेतला गेला आहे. (Ahilyanagar)

या निर्णयामुळे सरकारच्या हिंदुत्ववादी मतदारांमध्ये सकारात्मक संदेश जाईल आणि धार्मिकतेला महत्त्व दिले जात असल्याचे संकेत मिळतील. तसेच महायुती सरकारच्या ऐतिहासिक मूल्यांच्या जोपासणीत ही नामांतराची प्रक्रिया राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्या धोरणाला बळकटी देत आहे. (Ahilyanagar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.