कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI(एआय) मध्ये गुंतवणूक वाढण्यावर भर देणार असून गुंतवणूकदारांना भविष्यात नवीन तंत्रज्ञानातून मुद्रीकरणाच्या संधी मिळतील, असे आश्वासन मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी दिले आहे. (Mark Zuckerberg)
“आम्ही ऐतिहासिकदृष्ट्या आमच्या प्रॉडक्ट प्लेबुकच्या या टप्प्यात आमच्या स्टॉकमध्ये बरीच अस्थिरता पाहिली आहे. त्यामुळे आम्ही नवीन उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणूक करत आहोत, परंतु अद्याप त्याचे मुद्रीकरण झाले नाही, मात्र रील्स, स्टोरीज, न्यूज फीड मोबाईल आणि इतर गोष्टींमध्ये ते रुपांतरित करण्यात आले आहेत, अशी माहिती झुकेरबर्ग यांनी बुधवारी, (२४ एप्रिल) एका कॉन्फरन्स कॉलद्वारे दिली.
(हेही वाचा – Weather Department: मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुण्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस; हवामान खात्याचा इशारा )
एआयच्या शर्यतीत वर्चस्व मिळवण्याच्या शोधाला पाठिंबा
दिग्गज मायक्रोसॉफ्ट आणि गुगल आणि ओपनएआयसारख्या आघाडीच्या कंपन्यांसोबत सुरू असलेल्या एआयच्या शर्यतीत वर्चस्व मिळवण्याच्या शोधाला पाठिंबा देण्यासाठी पायाभूत सुविधांवर अपेक्षेपेक्षा कोट्यवधी डॉलर्स अधिक खर्च करणार असल्याचे झुकेरबर्ग यांनी सांगितले.
पायाभूत गुंतवणुकीला चालना देण्यासाठी
सोशल नेटवर्किंग जायंटने आपल्या महत्त्वाकांक्षी एआय संशोधन आणि उत्पादन विकास प्रयत्नांचे समर्थन करण्यासाठी पायाभूत गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ३० ते ३७ अब्ज डॉलर्सच्या पूर्वीच्या श्रेणीवरून २०२४ सालासाठी आपला भांडवली खर्चाचा अंदाज $35-$40 अब्ज इतका वाढविला. २०२५ मध्येही हा खर्च वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेही पहा –