बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेकरता ११ जुलै २०२२ पासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून खारघरपर्यंत संपूर्ण दिवस-रात्र बससेवा वातानुकुलित बसमार्ग क्र. एअरपोर्ट सेवा २ कार्यान्वित केली आहे. ही सेवा दर ९० मिनिटांनी असायची. परंतु आता ५० मिनिटांमध्ये ही बस सेवा उपलब्ध राहणार आहे.
मुंबई विमानतळ येथून पाम बीच मार्ग, एन. आय. आर. कॉम्प्लेक्स सी वुड, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर मार्गे जलवायू विहार ते खारघरपर्यंत संपूर्ण दिवस रात्र बससेवा वातानुकुलित बसमार्ग क्र. एअरपोर्ट सेवा २ कार्यान्वित केली आहे. परंतु प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार १५ जुलै २०२२ पासून या बससेवेचे प्रस्थानांतर ९० मिनिटांवरून ५० मिनिटे एवढे कमी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सदर बसमार्गावर प्रवास करण्याकरता प्रवासी बेस्ट चलो मोबाईल अॅप, बेस्ट चलो बसकार्ड आणि एन.सी.एम.सी. या कार्डाचा उपयोग करुन आपले तिकीट खरेदी करु शकतात. तरी सर्व प्रवाशांनी याची नोंद घेऊन, या बससेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात येत आहे.
( हेही वाचा: Mumbai High Court: महिलांना मूल किंवा करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य; उच्च न्यायालयाचा निर्वाळा )