कोकण रेल्वेचा प्रवास अधिक गारेगार

112

मुंबई- मडगाव एक्सप्रेस गाड्यांच्या डब्ब्यांत तात्पुरती वाढ करण्यात आली असून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्सप्रेस व मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाड्यांना प्रत्येकी चार तृतीय वातानुकूलित कोच जोडले जाणार आहेत.

( हेही वाचा : म्हाडाच्या 2800 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत, या तारखेपासून करु शकता अर्ज )

वातानुकूलित कोच जोडले जाणार

प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांच्या तिकिटाची स्थिती तपासण्याची विनंती रेल्वेने केले आहे . तर प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याची विनंतीही रेल्वेने केली आहे.

  • 11085 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्सप्रेसमध्ये २८.४.२०२२ ते २.६.२०२२ पर्यंत.
  • 11086 मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसमध्ये २९.४.२०२२ ते ३.६.२०२२ पर्यंत.
  • 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्सप्रेसमध्ये ३०.४.२०२२ ते ४.६.२०२२ पर्यंत.
  • 11100 मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसमध्ये १.५.२०२२ ते ५.६.२०२२ पर्यंत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.