Gujarat मध्ये हवाई दलाचे विमान कोसळले; वैमानिकाचा मृत्यू

46
Gujarat मध्ये हवाई दलाचे विमान कोसळले; वैमानिकाचा मृत्यू
Gujarat मध्ये हवाई दलाचे विमान कोसळले; वैमानिकाचा मृत्यू

गुजरातमध्ये (Gujarat) दि. ३ एप्रिल रोजी भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले. या दुर्घटनेत एक वैमानिक ठार झाला असून एकावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती भारतीय हवाई दलाने ‘एक्स’वरून दिली आहे. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्यात मागील काही काळापासून जग्वार लढाऊ विमानांच्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

( हेही वाचा : Mumbai Crime : मुंबई विमानतळावर १७.८९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

हवाई दलाने (Indian Air Force) दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ एप्रिलला रात्री प्रशिक्षण मोहिमेदरम्यान गुजरातमधील जामनगर (Jamnagar) हवाई दलाच्या तळाजवळील एका गावात भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) जग्वार लढाऊ विमान (Jaguar fighter jet) कोसळले. वैमानिकांना विमानात तांत्रिक बिघाड लक्षात आला. त्यांनी विमानातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांनी एअरफील्ड किंवा स्थानिक लोकांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याचीही खात्री केली. या दुर्घटनेत एका वैमानिकाला गंभीर दुखापत झाली. त्याचा मृत्यू झाला. एका वैमानिकावर जामनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Gujarat)

याआधी मागील महिन्यात पश्चिम बंगाल-हरियाणा (West Bengal-Haryana) येथे दोन दुर्घटना झाल्या होत्या. यात पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे हवाई दलाच्या एका वाहतूक विमानाचे अपघात झाले. त्यात सुदैवाने AN-32 विमानातील सर्व क्रू मेंबर्स सुखरूप बचावले. तर दि. ७ मार्चलाच काही तास आधी, हरियाणातील (Haryana) पंचकुला येथील मोरनी येथील बलदवाला गावाजवळ भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) लढाऊ विमान जग्वार कोसळले होते. त्यावेळी अपघातानंतर वैमानिकाने पॅराशूटच्या साहाय्याने उतरून आपला जीव वाचवला. (Gujarat)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.