Air India Ticket Sale : एअर इंडियाचा ४ दिवसांचा तिकीट सेल

कंपनीच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर आकर्षक सूट

250
Air India Ticket Sale : एअर इंडियाचा ४ दिवसांचा तिकीट सेल
Air India Ticket Sale : एअर इंडियाचा ४ दिवसांचा तिकीट सेल
  • ऋजुता लुकतुके

आता टाटांच्या मालकीच्या असलेल्या एअर इंडियाचा चार दिवसांचा तिकीट सेल सुरू झाला आहे. या सवलतींचा काळ कुठला आहे, आणि कुठल्या तिकिटांवर किती सवलत मिळेल जाणून घेऊया…

एअर इंडिया कंपनीने गुरुवारपासून (१७ ऑगस्ट) ९६ तासांचा विशेष तिकीट सेल सुरू केला आहे. कंपनीच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर या दिवसांत आकर्षक सूट मिळणार आहे. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच्या प्रवासावर ही सूट मिळू शकेल. त्यासाठी एअर इंडिया वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवर बुकिंग करणं आवश्यक आहे.

इतकंच नाही तर या कालावधीत केलेल्या तिकिट बुकिंगवर कन्व्हेअन्स शुल्कही लागणार नाही. देशांतर्गत काही मार्गांवर एकेरी प्रवासाचे किमान भाडे या कालावधीत १,४७० रुपयांपर्यंत खाली आले आहे. तर बिझिनेस क्लाससाठी हेच भाडे १०,१३० रुपयांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

(हेही पहा – Petrol-Diesel Prices : तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, एका लिटरसाठी मोजावे लागणार इतके पैसे)

तर या कालावधीत एअर इंडियाच्या फ्लयिंग रिटर्न्स मेंबर क्लबच्या लोकांना त्यांनी केलेल्या प्रवासासाठी दुप्पट रॉयल्टी पॉइंट्स मिळतील. Airindia.com किंवा मोबाईल ॲपवर केलेल्या १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच्या बुकिंगसाठी हे सवलतीचे दर लागू असतील. आणि गुरुवारी सुरू झालेला हा सेल २० ऑगस्टला मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी संपेल.

एअर इंडिया वेबसाईट बरोबरच कंपनीचे अधिकृत तिकीट विक्री एजंट आणि ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट्स यांच्या मार्फत केलेल्या बुकिंगध्येही सेलचे दर लागू होतील. पण, त्यावर इतर सुविधा मिळणार नाहीत. या विमान प्रवासात काही ठराविक सीट्सनाच ही सवलत लागू होणार आहे. आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ही सवलत मिळेल.

एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे गेल्यावर ही विमान कंपनी आता आपल्या सेवेत अनेक बदल करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपला नवीन लोगो द व्हिस्टा अलीकडेच लाँच केला आहे. नवीन विमानं कंपनीच्या ताफ्यात सामील होत आहेत. आणि ‘भारतीय आत्मा असलेली देशाची आंतरराष्ट्रीय विमानसेवा,’ अशी या विमानसेवेची ओळख टाटांना बनवायची आहे.

कंपनीच्या देशांतर्गत विमान सेवेत महाराजा मात्र कायम राहणार आहे. कंपनीने अलीकडे एअरबस आणि बोईंग कंपनीला ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. लांबच्या विमान प्रवासासाठी ही विमानं वापरली जाणार आहेत. तर आता ताफ्यात असलेली विमानांचं नुतनीकरणही कंपनीने हाती घेतलं आहे.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.