-
ऋजुता लुकतुके
एअर इंडियाने अलास्का एअरलाईन्सबरोबर एक महत्त्वाचा करार केला आहे आणि त्यानुसार, दोघं संयुक्तपणे अमेरिका आणि कॅनडात ३२ ठिकाणी हवाई सेवा देणार आहेत. (Air India-Alaska Tie Up)
एअर इंडिया कंपनीने अलास्का एअरलाईन्स या अमेरिकन कंपनीबरोबर एक महत्त्वाचा करार केला आहे आणि त्यामुळे एअर इंडियाच्या प्रवाशांना अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोतील ३२ ठिकाणी विनासायन सलग प्रवास करता येणार आहे. अलास्का एअरलाईन्सची सेवा असलेली महत्त्वाची ठिकाणं आहेत न्यूयॉर्क, नेवार्क, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, सॅन फ्रान्सिस्को आणि व्हँकुअर. (Air India-Alaska Tie Up)
या करारात द्विपक्षीय इंटरलायनिंगची सोय असणार आहे. म्हणजेच उभय एअर लाईन कंपन्यांना दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कमधील विमानाचं तिकीट प्रवाशांना देता येणार आहे. त्याशिवाय एअर इंडियाच्या प्रवाशांना आता अलास्का एअरलाईन्सच्या नेटवर्कमध्ये असलेल्या विमानांचं थ्रू तिकीटही काढता येणार आहे. थ्रू तिकीट म्हणजे, तुमचा प्रवास सुरू होतो तिथेच तुम्हाला संपूर्ण प्रवासाचं तिकीट काढता येतं, जरी तुमचा पुढील प्रवास दुसऱ्या कंपनीच्या विमानातून होणार असेल तरी. बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात, तुम्ही टप्प्या टप्प्याने प्रवास करता आणि त्यासाठी मध्ये ट्रान्झिट घेता. (Air India-Alaska Tie Up)
(हेही वाचा – Virat Kohli 49th Ton : विराटच्या ४९व्या शतकानंतर पत्नी अनुष्काचा भावपूर्ण संदेश)
आता एअर इंडियाच्या करारामुळे तुम्ही पुढील विमान अलास्का एअरलाईन्सचं पकडू शकता आणि त्यासाठी तुम्हाला एकाच वेळी एअर इंडियाकडे पैसे भरता येतील. दोन वेगळ्या विमानांची वेगवेगळी बुकिंग करायला नकोत. असा सोयीसाठी दोन विमान कंपन्यांचा आधी करार असावा लागतो. तो करार आता एअर इंडिया आणि अलास्का एअरलाईन्स यांच्या दरम्यान झाला आहे. (Air India-Alaska Tie Up)
यामुळे प्रवाशांना तिकीटही थोड्या कमी पैशात मिळेल. सध्या एअर इंडिया आठवड्यातून ४७ थेट विमान सेवा चालवते. भारतातील दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई या शहरांमधून अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्क, नेवार्क, सॅन फ्रान्सिस्को आणि शिकागो ही शहरं थेट जोडली गेली आहेत. आता येणाऱ्या थंडीच्या हंगामात ५०० नवीन सेवा सुरू करण्याचा एअर इंडियाचा मानस आहे आणि यातील ५० टक्के सेवा या आंतरराष्ट्रीय असतील. त्यादृष्टीने कंपनीसाठी हा करार महत्त्वाचा आहे. (Air India-Alaska Tie Up)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community