धक्कादायक! एअर इंडियाच्या 45 लाख प्रवाशांच्या डेटाची चोरी! 

26 ऑगस्ट 2011 ते 20 फेब्रुवारी 2021 या कालावधी दरम्यानचा डेटा चोरीला गेल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. 

120

सायबर हल्ले अजूनही कमी होताना दिसत नाहीत. आतापर्यंत भारतातील मोठमोठ्या आस्थापनांना लक्ष्य करून त्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. जेव्हा भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या चाचण्यांना सुरुवात केली होती, तेव्हाही त्या कंपन्यांवर चिनी हॅकर्स सायबर हल्ला करणार आहे, असे वृत्त पसरले होते. आता भारताची सरकारी विमानसेवा असलेल्या एअर इंडियावर सायबर हल्ला केला आहे. त्यामाध्यमातून तब्बल ४५ लाख प्रवाशांचा डेटा चोरण्यात आला आहे, अशी धक्कादायक माहिती खुद्द एअर इंडियाने उघड केली आहे.

10 वर्षांतील डेटाची चोरी   

एअर इंडियाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या हल्ल्यामुळे जगभरातील सुमारे 45 लाख प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता एअर इंडियाने वर्तविली आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी पहिल्यांदा डेटा प्रोसेसर या कंपनीकडून याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर फटका बसलेल्या डेटा सब्जेक्टसची माहिती डेटा प्रोसेसरने 25 मार्च ते 5 एप्रिलदरम्यान आम्हाला दिली. 26 ऑगस्ट 2011 ते 20 फेब्रुवारी 2021 या कालावधीदरम्यानचा डेटा चोरीला गेल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

(हेही वाचा : राज्यपालांकडून घटनेचा भंग! संजय राऊतांच्या आरोप )

क्रेडिट कार्डाचीही माहिती 

यामध्ये ज्या प्रवाशांचा डेटा चोरीला गेला आहे, त्यामध्ये त्यांचे नाव, जन्मतारीख, संपर्काची माहिती, पासपोर्ट, तिकिट तसेच क्रेडीट कार्डची माहिती आहे. पासवर्डच्या माहितीचा यात समावेश नाही, मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून क्रेडिट कार्डाचा पासवर्ड बदलण्याची विनंती एअर इंडियाने केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.