लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाकडून क्रू-मेबर्सला बेदम मारहाण

116

एअर इंडियाच्या दिल्ली-लंडन विमानात प्रवाशाकडून क्रू मेंबरला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे हे विमान अर्ध्या रस्त्यातून पुन्हा दिल्ली विमानतळावर लँड करण्यात आले. याप्रकरणी एअर इंडियाने जसकिरत सिंग नावाच्या प्रवाशाविरोधात दिल्ली एअरपोर्ट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या मारहाणीत दोन क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत.

एअर इंडियाने या घटनेबाबत जाहीर केलेल्या निवदेनात नमूद केल्यानुसार, दिल्लीहून लंडनच्या हिथ्रो विमानतळाकडे निघालेल्या एअर इंडियाच्या एआय-111 विमानाने सोमवारी १० एप्रिल रोजी सकाळी ६.३५ वाजता दिल्ली विमानतळावरुन उड्डाण केले. पण या विमानातील जसकिरत सिंग नामक प्रवाशाने विमानाच्या क्रू मेंबर्सना बेदम मारहाण केली, असा गंभीर प्रकार घडल्याने विमानाच्या पायलटने विमान पुन्हा दिल्लीकडे वळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमान लँड झाल्यानंतर संबंधित प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विमानात असलेल्या सर्वांची सुरक्षा आणि आत्मसन्मान जपणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ज्या क्रू मेंबर्सना मारहाण झाली त्यांना आम्ही सर्वतोपरी मदत करू. यानंतर प्रवाशांना मनस्ताप झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करत दुपारी पुन्हा विमान लंडनसाठी शेड्यूल करण्यात आल्याचे एअर इंडियाने आपल्या निवदेनात नमूद केले आहे. दरम्यान विमानात गोंधळ घालणारा प्रवासी जसकिरत सिंग हा मनोरूग्ण असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली.

एअर इंडियाच्या विमानात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. एका प्रवाशाकडून महिलेच्या सीटवर लघवी केल्याच्या प्रकरणानंतर नुकतेच डीजीसीआयने एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला होता. तसेच त्यांच्या एका पायलट इनचार्जचे लायसन्सही तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते. आपल्या कर्तव्याचे व्यवस्थित पालन न केल्याबद्दल डिरेक्टर इन फ्लाईट सर्व्हिसेसला देखील ३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

(हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची लढाऊ ‘सुखोई 30’ मधून ऐतिहासिक सफर; यापूर्वी ‘या’ राष्ट्रपतींनी घेतला होता हा अनुभव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.