एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) ‘सिक लीव्ह’वर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. एअर इंडिया एक्सप्रेसनं अशा कर्मचाऱ्यांना कंपनीचा दैनंदिन कारभारात अडथळा आणल्याबद्दल आणि नियुक्तीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी मानून त्यांना बडतर्फीची नोटीस पाठवली आहे. (Air India Express)
एक प्रकारचा संपच
दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसच्या (Air India Express) 100 हून अधिक क्रू मेंबर्सनी बुधवारी (८ मे) आजारी असल्याची सबब देत अचानक रजा घेतल्या. त्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची 80 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली. या प्रकाराबाबत असंही सांगितलं जात आहे की, कर्मचाऱ्यांचं अचानक रजा घेणं म्हणजे, एक प्रकारचा संपच आहे. (Air India Express)
सीक लिव्हप्रकरणी बडतर्फीची नोटीस
एअर इंडिया एक्सप्रेसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसकडून सीक लिव्हप्रकरणी तब्बल 25 वरिष्ठ क्रू मेंबर्स टर्मिनेट करण्यात आलं आहे. सोबतच, आज एका टाऊन हॉल मिटिंगचे देखील मॅनेजमेंटकडून आयोजन करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं 13 मेपर्यंत एअर इंडिया एक्सप्रेसकडून कमी उड्डाणांसह शेड्युल्ड करण्यात येणार आहे. (Air India Express)
MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून मागवला अहवाल
MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत अहवाल मागवला आहे. सोबतच समस्यांचं त्वरित निराकरण करण्यास सांगितलं आहे. तसेच, डीजीसीएच्या निकषांनुसार प्रवाशांना सुविधा देण्याची त्यांना सूचना देण्यात आली आहे. (Air India Express)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community