इस्रायल आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, एअर इंडियाने शुक्रवारी तेल अवीव येथून ३० एप्रिल २०२४पर्यंत आपली सर्व उड्डाणे रद्द केली. यासंदर्भात एक पोस्ट अधिकृत ‘X’ हँडलद्वारे एअर इंडियाने शेअर केली आहे.
एअर इंडियाने म्हटले आहे की, “मध्य पूर्वेतील परिस्थिती लक्षात घेता, तेल अवीवमधून आमची उड्डाणे ३० एप्रिल २०२४ पर्यंत स्थगित राहतील. आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत तसेच आमचे ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे.
(हेही वाचा – K. Subramaniam: तामिळ चित्रपट उद्योग निर्माते आणि पटकथाकार !)
गेल्या रविवारीच एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, दिल्ली आणि तेल अवीवदरम्यानची थेट उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने जवळपास पाच महिन्यांच्या अंतरानंतर ३ मार्च रोजी इस्रायलची राजधानी जेरुसलेमसाठी सेवा पुन्हा सुरू केली होती. इस्रायली शहरावर हमासच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने ७ ऑक्टोबर २०२३ पासून प्रथम तेल अवीवची उड्डाणे निलंबित केली होती. एअर इंडिया राष्ट्रीय राजधानी आणि इस्रायल शहरादरम्यान साप्ताहिक ४ उड्डाणे चालवते.
अलीकडच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय प्रवासी एअरलाईन्स कंपन्यांनी या कारणास्तव त्यांची उड्डाणे स्थगित केल्याची माहिती आहे. १५ एप्रिल रोजी जर्मन एअरलाइन ग्रुप लुफ्थान्साने इराणच्या इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनंतर अम्मान, बेरूत, एरबिल आणि तेल अवीवची उड्डाणेदेखील स्थगित केली.
हेही पहा –