- ऋजुता लुकतुके
एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटांकडे गेल्यावर अनेक बदलांना सुरुवात झाली आहे. जुनी ७३७ विमानं जाऊन एअरबसची नवीन विमानं ताफ्यात दाखल होणार आहेत. आणि या नवीन विमानांवर असेल कंपनीचा नवीन लोगो. पाहूया तो कसा आहे. एअर इंडियाची मालकी आपल्याकडे आल्यावर टाटा कंपनीने अलीकडेच एअरबस कंपनीला नवीन ए३५० जातीच्या नवीन विमानांच्या बांधणीची ऑर्डर दिली होती. या विमानांवर कंपनीचा नवीन लोगो असणार आहे. त्यामुळे नवीन विमानांबरोबरच कंपनीचा चेहरामोहराही बदलेल. विमानातील प्रवास सुरू झाल्यापासून किंवा अगदी विमान उडताना तुम्ही जमिनीवरून पाहात असाल तरीही कंपनीचा हा नवीन लोगो ठळकपणे दिसणार आहे.
‘एअर इंडिया एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. आणि येणारा काळ हा अनंत संधी घेऊन येणार आहे. नवीन एअर इंडियाचा अनुभव कसा असावा यासाठी आम्ही १५ महिने काम करत आहोत,’ असं टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांच्या हातात नवीन एअरबसचं मॉडेलही होतं. आणि त्यावर ठळकपणे लिहिलेलं होतं ‘एअर इंडिया’! पांढरा, लाल आणि सोनेरी रंगाची संगती विमानांसाठी कायम ठेवण्यात आली आहे. तर दरवाजा तसंच खिडक्यांना जुन्या टाटांच्या काळातल्या विमानांना होती तशी भारतीय चौकट पुन्हा लावण्यात आली आहे. ही चौकट सोनेरी रंगाची असेल. या विमानाची इंजिनाकडची बाजू लाल रंगात तर पंखांची कड सोनेरी रंगात रंगवण्यात आली आहे.
(हेही वाचा – Corona : अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबईत कोरोना रुग्णाचा मृत्यू)
नवीन एअरबसचं डिझाईन आणि मॉडेलिंग तसंच नवीन लोगो तयार करण्यात टाटा कंपनीने ४० कोटी अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत. ‘नवं ब्रँडिंग एअर इंडियाच्या परंपरेला साजेसं आणि त्याचवेळी जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात उठून दिसेल असं आहे. जगातील एक प्रिमिअर विमान सेवा देणारी ही कंपनी असेल. मात्र तिचे प्राण भारतीय असतील,’ असं चंद्रशेखरन यांनी आवर्जून सांगितलं. अर्थात, नवीन विमानांची बांधणी अमेरिकेत अजून सुरू आहेत. आणि त्यांची पहिली फळी डिसेंबरमध्ये भारतात येईल. एअर इंडियाने यावर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन कंपनी एअर बसला ३०० नवीन विमानांची ऑर्डर दिली होती. डिसेंबर २०२३ पासून ही विमानं भारतात दाखल होतील. आणि त्यानंतर टप्प्या टप्प्याने आधीची ७७७ आणि ७८७ ही ड्रीमलायनर विमानं सेवेतून काढून टाकण्यात येतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community