अखेर एअर इंडिया झाली टाटाच्या मालकीची…

97

एअर इंडियाच्या धोरणात्मक नियोजनबद्ध निर्गुंतवणूक व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र सरकारला या व्यवहारातील भागीदार मेसर्स टॅलस प्रायव्हेट लिमिटेड (मेसर्स टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी) कडून 2,700 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. तसेच 15,300 कर्ज, एअर इंडिया आणि AIXL कडेच ठेवण्यात आले आहे. एअर इंडियाचे सर्व शेअर्स या कंपनीच्या नावे करण्यात आले आहेत.

करार 25 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आलेला

इथे हेही सांगणे औचित्याचे ठरेल की, मेसर्स टॅलस प्रायव्हेट लिमिटेडने एअर इंडियाच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सर्वाधिक बोली लावल्यामुळे या बोलीला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. त्यानुसार, बोली जिंकणाऱ्या कंपनीला 11 ऑक्टोबर 2021 रोजी इरादापत्र देण्यात आले होते. तसेच समभाग खरेदी करार, 25 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आला होता. त्यानंतर या व्यवहारातील भागीदार (M/s Talace Pvt Ltd) एअर इंडिया आणि केंद्र सरकारने एकत्रित बसून या व्यवहारासाठीच्या सर्व अटी शर्ती पूर्ण केल्या. यात अॅंटी ट्रस्ट बॉडीज, नियामक, कर्जदाता संस्था आणि तिसऱ्या पक्षांकडून मंजुरी मिळवण्याचाही समावेश होता. दोन्ही बाजूंच्या परस्पर सहमतीने या अटी शर्ती निश्चित करण्यात आल्या होत्या.

(हेही वाचा वाझेची फाइलही मंत्रालयातच चाळली! किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.