Airport : ड्युटी संपली म्हणून पायलट आंतरराष्ट्रीय फ्लाईट सोडून गेला; प्रवाशांना रस्ते मार्गाने पाठवले दिल्लीला

212

लंडनहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानाचा पायलट फ्लाईट जयपूरला सोडून निघून गेला. पायलटने सांगितले की त्याची ड्युटीची वेळ संपली आहे. जयपूर विमानतळावर विमानात बसलेले प्रवासी तब्बल 6 तास त्रासात अडकून पडले. नंतर त्यांना रस्त्याने दिल्लीला पाठवण्यात आले. दिल्लीतील खराब हवामानामुळे रविवारी 3 आंतरराष्ट्रीय आणि 2 देशांतर्गत उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आली. यामध्ये एअर इंडियाच्या दोन, स्पाइसजेटच्या दोन आणि गल्फ स्ट्रीमच्या एका विमानाचा समावेश होता.

ही उड्डाणे वळवण्यात आली

एअर इंडियाचे विमान AI-112 लंडनहून सकाळी 6 वाजता दिल्लीला पोहोचणार होते. खराब हवामानामुळे विमान जयपूरकडे वळवण्यात आले. एअर इंडियाचे दुसरे विमान दुबईहून दिल्लीला जात होते.गल्फ स्ट्रीमचे विमान बहारीनहून दिल्लीला जात होते. स्पाइस जेटचे एक विमान पुण्याहून तर दुसरे गुवाहाटीहून दिल्लीला जात होते.

(हेही वाचा Land Jihad : भाईंदरमध्ये लँड जिहाद; सरकारी जमिनीवर बांधला दर्गा; ‘हिंदू टास्क फोर्स’ने उघडकीस आणले )

मंत्र्यांना ट्विट केले, तरीही सहा तास त्रास

विमानातील ब्रिटिश-भारतीय आदितने सांगितले की, प्रवाशांना त्रास होत आहे, परंतु एअर इंडियाने त्यांना दिल्लीला पाठवण्याची व्यवस्था केली नाही. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांना ट्विट करून तक्रार केली. यानंतर एअर इंडियाने उत्तर दिले आणि लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तरीही लोकांना 6 तासांहून अधिक काळ त्रास सहन करावा लागला. नंतर एअर इंडियाने काही प्रवाशांना व्होल्वो बसने तर काहींना कॅबने दिल्लीला पाठवले.

दीडशेहून अधिक प्रवाशांचे हाल झाले

उड्डाण वळवल्यामुळे जयपूर विमानतळावर सुमारे 6 तास 150 हून अधिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. विमानाचे उड्डाण वळवल्यानंतर संतप्त प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ सुरू केला. प्रवाशांची नाराजी कमी व्हावी म्हणून विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवाशांना जेवण व इतर सुविधा देण्यात आल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.